आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरसौष्ठव क्षेत्रातील उगवता तारा अमरावतीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: आंतरविद्यापीठ शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा राज साहू
अमरावती - पठाणकोट येथील अखिल भारतीय आंतर विद्यापीठ शरीर सौष्ठव (बाॅडी बिल्डिंग) स्पर्धेत अमरावतीच्या राज साहूने पिळदार शरीराचे प्रदर्शन घडवून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला या खेळातील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले अन् तो प्रकाशझोतात आला.
याआधीही त्याने लक्षात राहण्याजोगी कामगिरी केली असली, तरी त्याला प्रसिद्धीचा हव्यास नसल्यामुळे त्याच्या देखण्या कामगिरीबद्दल कोणालाही फारशी माहिती नव्हती.

शरीर सौष्ठव क्षेत्रात सुरुवातीला राजने एकलव्याप्रमाणे प्रवास सुरू केला. वडील जिल्ह्यातील नामांकित कुस्तीपटू असल्यामुळे त्यांचे प्रोत्साहन मिळत राहिले. एकट्यानेच शरीर पिळदार बनवण्यासाठी साधना सुरू केली. बराच काळ परिश्रम घेतल्यानंतर हवे तसे शरीर घडायला लागले. जिल्हा अन् विदर्भ स्तरावर यशही मिळायला लागले. मात्र, मनात त्याहीपेक्षा उत्तुंग भरारी घेण्याची इच्छा असल्यामुळे नंतर राजने ज्युनियर मिस्टर इंडिया अन् विदर्भ श्री किताब पटकावणारे विशाल शिंदे यांच्या मार्गदर्शनात सराव सुरू केला. शरीर सौष्ठवपटू, आहारतज्ज्ञ दीपक ठाकूर यांचेही राजला मार्गदर्शन लाभले. आता तो देशातील खुल्या शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी तयारी करीत आहे.

कारकीर्दीतील यश
>पठाणकोटयेथील आंतरविद्यापीठ शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये ‘सुवर्ण’.
>चेन्नईतील आंतरविद्यापीठ शरीर सौष्ठव स्पर्धा २०१४ मध्ये ‘कांस्य’.
>अमरावती जिल्हा शरीर सौष्ठव स्पर्धेत पाच विजेतेपदांनी भरली झोळी.

खर्च लाखाचा, अन पुरस्कार दोन हजार
अ.भा.विद्यापीठ शरीर सौष्ठव स्पर्धेत विद्यापीठाला सुवर्णपदक जिंकून देणा-या राजला तयारीसाठी एक लाखांचा खर्च आला. सकस अाहार फूड सप्लीमेंट्स घ्यावे लागतात. जिममध्ये जावे लागते. शरीर कमावणे सोपे काम नाही,असे तो म्हणतो.