आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वरुड- इस्त्राईल तंत्रज्ञानाचा वापर करून इटलीच्या एका कंपनीने संत्रा झाडांचे पुनर्जीवन करणारी मशीन तयार केली आहे. सध्या ही मशीन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत नागपूर येथील कृषि महाविद्यालयाकडे उपलब्ध आहे.
वरुड येथील संत्रा उत्पादक संघाच्या मागणीमुळे नागपूरच्या संत्रा गुणवत्ता केंद्राने मागील एक महिन्यापासून ही मशीन तालुक्यात पाठवली आहे. शेंदूरजनाघाट येथील शेतकर्यांना या मशीनचे नुकतेच प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. एका दिवसात 1500 झाडांचे सल व फांद्या 15 फूट उंचीपर्यत व्यवस्थितपणे कापते. मजुरीच्या तुलनेत वेळ आणि पैशाची बचत होते. एक हजार रुपये प्रतिएकर दराने ही मशीन काम करीत आहे. या मशीनद्वारे जरूड, वरुड, शेंदूरजनाघाट, तिवसाघाट येथील संत्राबागांचे पुनर्जीवन करण्यात आले आहे.
65 हॉर्स पॉवरच्या ट्रॅक्टरवर ही मशीन उजव्या बाजूला फिट केली आहे. यावर झाडाच्या फांद्या कापणार्या फोल्डिंग बीचवर दहा दातेरी चक्रे बसवली आहेत.एका दिवसात 1500 झाडाच्या फांद्या 15 फूट उंचीपर्यत व्यवस्थितपणे कापते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.