आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Year Malnutrition Anganavadyani Been A First Step To Salvation

नववर्षात कुपोषणमुक्तीकडे अंगणवाड्यानी टाकले पहिले पाऊल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती -जिल्‍हाधिका-यांनी महापालिकेच्या या पुरोगामी पावलाचे कौतुक केले. कुपोषणावर नियंत्रण आणण्याचा दिशेने अंगणवाड्यांमध्ये बदल घडवण्याचे हे स्तुत्य पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात मंगळवारी आयोजित एका कार्यक्रमात या यंत्रांचे वितरण करण्यात आले. अंगणवाड्यांमध्ये येणाºया मुलांचे या यंत्रांच्या माध्यमातून अचूक वजन घेणे शक्य होणार आहे. नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत
तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाने हा प्रयोग हाती घेतला आहे. वयानुसार वजन, उंची आणि उंचीनुसार वजन या तत्त्वावर हे यंत्र काम करणार आहे. संगणकीकृत असल्याने बालकांची संपूर्ण माहिती त्यामध्ये साठवून ठेवणे शक्य होईल. प्रत्येक महिन्याला बालकाचे वजन केल्यानंतर ती माहिती त्यामध्ये संकलित होऊन, आवश्यक ती सूचनादेखील प्राप्त होईल.
शहरी भागात बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण अधिक असल्याचे शासनाच्या पाहणीदरम्यान निदर्शनास आले होते. त्यानुसार अमरावती महापालिका क्षेत्रात राष्‍ट्रीय शहरी आरोग्य योजनेस सुरुवात करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ अंगणवाड्यांना संगणकीकृत वजनमापक यंत्र दिले जात आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून महापालिकेचे आयुक्त अरुण डोंगरे, उपमहापौर नंदकिशोर
वहाडे , विरोधी पक्षनेते प्रा. प्रशांत वानखडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन महिला व बाल विकास विभागाचे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी केले. वजनमापक यंत्राचा फायदा कसा होईल व हे यंत्र कसे कार्य करते, याविषयी मान्यवरांनी या वेळी माहिती दिली.

वजनमापक यंत्र असे करेल काम
बालकांच्या वजनासोबतच मोबाइल क्रमांक, बालकाची जन्मतारीख आदींची अंगणवाडी सेविका वजनमापक यंत्रामध्ये नोंद ठेवू शकते. प्रत्येक महिन्याला बालकांचे वजन नोंदले जाते. वयानुसार बालकाची उंची आणि वजन किती असावे, याबाबतदेखील यंत्र माहिती देते.
प्रथम टप्पात 178 यंत्रे
पहिल्या टप्प्यात 178 वजनमापक यंत्रे देण्यात आली आहेत. दोन अंगणवाड्या मिळून एक अशी व्यवस्था सध्या करण्यात आली आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर सर्वच अंगणवाड्यांना ही यंत्रे पुरवली जाणार आहेत.