आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रेशनवर लक्ष, पाचशेवर पोलिस दक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - नववर्षाच्या जल्लोषात तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत असल्याने त्या भरात काही अप्रिय घटना घडत असल्याचा अनुभवही आहे. या पार्श्वभूमीवर उत्साहाला गालबोट लागू नये, यासाठी पोलिस सज्ज राहणार आहेत. नागरिकांनी आनंदमय आणि सकारात्मक वातावरणात नववर्ष साजरे करावे, असाच पोलिसांचा प्रयत्न राहणार आहे.

संपूर्ण शहरात 31 डिसेंबरला सायंकाळी पाचपासून बंदोबस्त कार्यरत होणार असून, 48 ठिकाणी ‘फिक्स पॉइंट’ लावण्यात येणार आहेत. त्या प्रत्येक ‘पॉइंट’वर पोलिस उपनिरीक्षक किंवा सहायक उपनिरीक्षक आणि चार ते पाच कर्मचारी कार्यरत राहतील. वाहतूक नियंत्रणासोबतच मद्यपी वाहनचालकांवर कारवाईची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. शहर वाहतूक शाखेचे कर्मचारीही कार्यरत असतील. पोलिस आयुक्त अजित पाटील रात्री स्वत: शहरात फिरून बंदोबस्ताचा आढावा घेतील. अवैध मद्य वाहतूक रोखण्यासाठी बॉर्डर सिलींग पॉइंटवर पथक तैनात राहणार आहे.

पोलिसांच्या सुट्या रद्द :‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व पोलिसांच्या साप्ताहिक सुट्या एक जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.