आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचवीचा प्रवेश; ३३ हजार विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्ह्यातील ६६७ शाळांमध्ये पाचवी प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून तब्बल ३३ हजार विद्यार्थी पाचवी प्रवेशाच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती आहे. शहरातील आठ ते दहा शाळांमध्ये प्रवेशासाठी सोडत काढली जाणार आहे. नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून पालकांची धडपड सुरू आहे. येथील प्रवेशासाठी १० जून रोजी सोडत काढली जाणार आहे.
जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका तसेच खासगी संस्थांच्या माध्यमिक शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत. या एकूण ६६७ शाळांमध्ये वर्ग ची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. शैक्षणिक दर्जा चांगला असल्याने काही शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून पालकांकडून प्रयत्न केले जातात. काही वर्षांपूर्वी गुणवत्ता यादीनूसार प्रवेश दिले जात असल्याने अनेक सामाजिक आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. त्यामुळे सोडत पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रवेशासाठी सोडत काढली जात असल्याने अनेक पालक या शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून अर्ज प्राप्त करण्यास प्राथमिकता देतात. पाचवी प्रवेशासाठी अर्ज देण्याची प्रक्रिया जूनपासून सुरू झाली असून, शनिवारी अंतिम दिवस असल्याने शहरातील मोजक्याच आठ ते दहा शाळांमध्ये अर्ज भरणाऱ्यांची गर्दी दिसून आली.
पालकांकडून पसंती क्रमानूसार आलेल्या अर्जातून प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून सोडत काढली जाते. सोडत लागलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळेत प्रवेश दिला जातो. शासकीय शाळांचा शैक्षणिक दर्जा उत्तम राहत नसल्याने सामान्यांसह अनेकजण नामांकित शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रयत्नरत असतात. नामंकित शाळेत प्रवेश मिळावा म्हणून येथेच अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या देखील अधिक असते. प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची प्रथम सोडत बुधवार १० जून रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे.
पालकांच्या उपस्थितीत प्रवेशासाठी सोडत काढली जाणार आहे.पहिल्या सोडतीतील पात्र विद्यार्थ्यांना ११, १२ १३ जून रोजी प्रवेश निश्चित करणे गरजेचे आहे. त्यानंतर दुसऱ्या सोडतीमध्ये पहिल्या सोडतीत पात्र विद्यार्थ्यांना समाविष्ठ करुन घेतल्या जाणार नाही. जागा रिक्त असल्यास मंगळवार १६ जून रोजी सकाळी ११ वाजता दुसरी सोडत काढली जाईल. सोबतच द्वितीय सोडतीनंतर शिल्लक राहणाऱ्या संभाव्य जागांसाठी प्रतिक्षा यादीकरिता सोडत काढण्यात येईल. दुसऱ्या सोडतीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना १६,१७ १८ जून रोजी प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.