आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नवसंजीवनी’ ला दांडी, आठ जणांवर आहे टांगती तलवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- कुपोषण मेळघाटातील इतर समस्यांचा वेध घेऊन त्याची सोडवणूक करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नवसंजीवनी समितीच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या विविध खात्याच्या आठ अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.
हे सर्व अधिकारी नवसंजीवनीच्या बैठकीला अनुपस्थित राहिले म्हणून त्यांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचा निर्णय तर यापूर्वीच घेण्यात आला आहे. मात्र गैरहजेरीबाबतचे स्पष्टीकरण समाधानकारक नसले तर या सर्वांची आगामी सप्टेंबर मह्यात देय असलेली वेतनवाढ का गोठवू नये, असा विचारही जिल्हा प्रशासन करीत आहे.
खोज इतर संस्थांनी पाठपुरावा केल्यामुळे अध्यक्ष या नात्याने ल्हाधिकारी यांनी ही बैठक तत्काळ बोलावून घेतली. परंतु प्रत्यक्षात या बैठकीला आठ अधिकारी अनुपस्थित होते. मेळघाटातील कुपोषण शेतीसंबंधी दुरवस्था हा शासनासह न्यायालयाच्याही पटलावर आलेला विषय आहे. त्यामुळे दोन्ही यंत्रणांचे याकडे बारीक लक्ष असते. अशा स्थितीत जिल्हाधिका-यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केली. परंतु तब्बल आठ विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीला दांडी मारल्यामुळे बैठकीत पाहीजे तसे नियोजन होऊ शकले नाही.
दरम्यान आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांनी या बैठकीचे इतिवृत्त नुकतेच जिल्हा कचेरीत पाठविले असून त्यामध्ये या सर्व बाबींचा उल्लेख केला जाण्याची शक्यता आहे. बैठकीत कुपोषण यंत्रणासह आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी राबवावयाच्या योजनांची मांडणी यावेळी जिल्हाधिका-यांनी केली.
वेळेवर निमंत्रण मिळाल्याचा आरोप
दरम्यान नवसंजीवनीच्या बैठकीचे निमंत्रण वेळेवर मिळाल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. नवसंजीवनीच्या बैठकीला उपस्थित राहून यंत्रणेबाबतची मते मांडण्याचे काम काही संस्थांवर सोपविण्यात आले आहे. ‘खोज’ ही त्यापैकीच एक संस्था आहे. परंतु या संस्थेच्या प्रतिधीला अगदी वेळेवर निमंत्रण दिले गेले, अशी माहिती आहे.
बातम्या आणखी आहेत...