आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेची चोरी; जीवावर भारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- वीजवितरणचे अभियंता, कर्मचाऱ्यांच्या नाकावर टिच्चून निर्धास्तपणे विजेची चोरी करणाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिला नसल्याची बाब वीज चोरी करण्यासाठी लढवण्यात आलेल्या शक्कलवरून शहरात उघडकीस आली आहे.
पथदिव्यांच्या खांबावरून वायर जमिनीत गाडत नेऊन वीज चोरी केली जात असल्याच धक्कादायक प्रकार शहरातील व्हीआयपी समजल्या जाणाऱ्या विश्रामगृहाच्या मार्गावर उघडकीस आला आहे. मात्र, ही विद्युत चोरी इतरांचा जीव घेणारी ठरू शकते, असा संताप येथील काही नागरिकांनी व्यक्त केला अाहे. गोपालनगरातील हॉलीक्रॉस शाळा परिसरातील मार्गावर असलेल्या वीज खांबावरून वीजेची चोरी केली जात असून, थेट खांबावर चढून वायरची जोडणी केली आहे.
खांबावरील विद्युत तारांना वायरची जोडणी करून खांबावरून सराळ दिशेने वायर जमिनीत गाडून घरापर्यंत नेण्यात आल्याचे दिसून येते. नेमका याचा खांबाजवळून गाडण्यात आलेले जिवंत विद्युत वायर उघडे असून, येथे शॉक लागून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या जिवंत तारांच्या संपर्कात आल्यास केव्हाही मोठी दुर्घटना घडू शकते. जिवंत विद्युत तार एका नालीद्वारे झोपडपट्टी परिसरात अवैधरित्या नेण्यात आली आहे. वर्दळीच्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी होत असल्याचा प्रकार वीज वितरण कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या लक्षात येऊ नये, ही एक मोठी शोकांतिका असल्याच्या प्रतिक्रिया येथील नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
वीज चोरीबाबत अभियंता, कर्मचारी आहेत अनभिज्ञ
शहरातील चिखलदरा चौकाली अंबिका लॉन िवश्रामगृहाकडे जाणाऱ्या या मार्गावरून आमदार, मंत्रीमहोद््याचे आवागमण असते. तरीसुद्धा ही जीवघेणी विद्युत चोरी संबंधित अभियंत्यांच्या लक्षात येऊ नये, ही आश्चार्याची बाब आहे.
उपकार्यकारी अभियंत्याने ठेवले कानावर हात
वीज चोरी कायद्याने गुन्हा असल्याचे सांगणाऱ्या अधिकाऱ्यांचे उर्मट उत्तर वीज वितरणची मान शरमेने खाली घालायला लावणारी ठरली आहे. जीवघेणी वीज चोरी सुरू असल्याची माहिती वजा संबधित अधिकाऱ्याचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पत्रकारांनी कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी यांचे दालन गाठले. परंतु, ते अमरावतीत महत्त्वाच्या बैठकीत गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उपकार्यकारी अधिकारी महेश कोकाटे यांना वीज चोरीचा हा प्रकार सांगण्याता आला. परंतु, त्यांनी तक्रारीवर दुर्लक्ष करत कामात त्यांनी व्यस्तता दाखवली. ही तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करा. माझ्याकडे इतर तालुक्यांचे काम असून, तक्रार घेण्याचे काम आपल्याकडे नसल्याचे सांगून बेजबाबदार उत्तर त्यांनी दिले.
कुठे गेले पथक?
वीजचोरी पकडण्यासाठी वीज वितरणकडे स्वतंत्र पथक आहे. परंतु, राजरोजपणे हा सुरू असलेला वीज चोरीचा प्रकार रोखणारे पथक आता गेले तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे विद्युत खांबावरील पथदिवे दुरुस्तीसह इतर कामासाठी कर्मचारी विद्युत खांबावर चढत असताना त्यांना ही विद्युत चोरी कशी दिसून येत नाही, असा संतापही सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
जाणीवपूर्वक दुर्लक्ष
- जुळ्या शहरात होत असलेल्या या जीवघेण्या वीज चोरीमुळे इतरांचाही जीव धोक्यात आहे. यासंदर्भात अनेकदा वीज वितरणच्या अभियंत्याकडे तक्रार केली आहे. परंतु, अधिकाऱ्यांचे याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
राजेश डांगे, गोपालनगर निवासी.
बातम्या आणखी आहेत...