आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपोस्ट डेपोची जागा बदलण्यासाठी याचिका, खतनिर्मितीला विरोध नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शेतकऱ्यांची जमीन हिसकावून घेतल्यामुळे वादग्रस्त ठरलेला अमरावतीचा कंपोस्ट डेपो आता पुन्हा पर्यावरणवाद्यांच्या वादात अडकला असून, जागा बदलल्यास शासनाविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्याचा िनर्णय त्यांनी घेतला आहे.
प्रभात िनसर्ग संस्कार मंडळाने त्यासाठी पुढाकार घेतला असून, िवविध संस्थांच्या सहभागाने एक कृती समिती गठित केली आहे. या कृती समितीच्या बॅनरखाली प्रारंभी मनपा, महाराष्ट्र प्रदूषण िनयंत्रण मंडळ शासनासोबत पत्रव्यवहार केला जाणार असून, संबंधितांना आपली भूमिका समजावून सांगितली जाईल.
जर या पत्रव्यवहाराने काम झाले, तर न्यायालयात जाण्याची गरज नाही. नाहीतर तीन महिन्यांच्या कालावधीत केव्हाही जनहित याचिका दाखल करून न्याय मागितला जाईल, असे कृती समितीचे म्हणणे आहे. कृती समितीचे संयोजक विलास पवार यांनी रविवारी फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत हा मुद्दा स्पष्ट केला.
कृती समितीने केलेल्या दाव्यानुसार, हे कंपोस्ट डेपो शहरापासून जेवढ्या अंतरावर (५ किलोमीटरच्या पुढे) असायला पाहिजे, तेवढा दूर नाही. त्यामुळे प्रदूषणाचा फैलाव वाढणार असून, भविष्यात मानवहानी होईपर्यंतचे परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे हा तो तत्काळ शहरी सीमेच्या बाहेर नेला पाहिजे.
पत्रकार परिषदेला िवलास पवार यांच्यािशवाय राष्ट्रीय हरित सेनेचे पी. आर. पाटील शरद िसरसाट, प्रभात िनसर्ग संस्कार मंडळाचे िकरण बावस्कर, लोकल आर्म एन्व्हायर्सचे इंद्रपाल वर्मा, क्रांती वेलफेअर सोसायटीच्या कविता पवार, जयवंत गाडेकर, प्रल्हाद कोल्हे, प्रकाश िजरापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

तीनमहिन्यांचा कालावधी
कंपोस्टडेपो त्यावर सुरू केल्या जाणाऱ्या खतनिर्मिती प्रकल्पाच्या स्थानांतरणासाठी कृती समितीने तीन महिन्यांचा कालावधी िनश्चित केला आहे. या कालावधीत कंपोस्ट डेपो हटला नाही, तर त्याविरुद्ध थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली जाणार आहे. भविष्यात वायूप्रदूषण वाढले, तर अख्खे शहर या प्रकल्पामुळे वेठीस धरले जाईल, अशी शास्त्रीय मांडणीही या वेळी केली.
घनकचऱ्यापासून खत निर्मितीच्या प्रकल्पाला आपला िवरोध नसून, तो सध्याच्या कंपोस्ट डेपोवर सुरू करता कंपोस्ट डेपोच्या स्थानांतरित जागी सुरू करावा, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. त्यांच्या मते, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कचऱ्याचे िरसायकलिंग आवश्यक असून, ती व्यवस्था एकाच जागेऐवजी कचऱ्याचे वर्गीकरण आधी ठरल्याप्रमाणे शहराच्या पाच झोनमध्ये पाच िठकाणी करणे जास्त श्रेयस्कर आहे.