आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘नो एन्ट्री’चे हाय टेन्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जडवाहनांना शहरात प्रवेश बंदीचा कुठला वेळ असावा, यावर गुरुवारी (दि.५) पोलिस आयुक्तालयात झालेल्या बैठकीतही तोडगा निघाला नाही. पोलिसांनी नो एन्ट्री संदर्भात काढलेली प्रस्तावित अधिसूचना ट्रान्सस्पोर्टधारकांना अमान्य आहे. त्यामुळे जड वाहनांचा जुनाच वेळ असावा, अशी घोषणाबाजी बैठकीत ट्रान्सपोर्टधारकांनी केली.
दरम्यान, ट्रान्सपोर्ट धारक नागरिकांचा अभिप्राय घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त बी. के. गावराने यांनी स्पष्ट केले. ट्रान्स्पोर्ट धारकांनी एकदम ताणून धरता शहरातील नागरिकांच्या दृष्टीने विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले. तर प्रस्तावित सूचना रद्द करावी, पोलिस प्रशासन जो काही निर्णय घेईल तो ट्रान्स्पोर्ट धारकांना विचारात घेऊन करावा आणि निर्णय होईस्तोवर नो एन्ट्रीसाठी जुनाच वेळ द्यावा, अशी मागणी यावेळी ट्रकचालकांनी पोलिसांकडे रेटून धरली.

दरम्यान, गुरुवारी (दि.५) झालेल्या बैठकीत प्रभावी तोडगा निघाला नाही, त्यामुळे पुढील बैठक १२ किंवा १३ फेब्रुवारीला आयुक्तालयातील सभागृहात होईल, असे गावराने यांनी स्पष्ट केले. तोपर्यंत कुठल्याही वाहनांवर कारवाई होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. पुढील बैठकीत काय निर्णय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बैठकीला आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश अणे, विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक आर. डी. अहिरे, पोलिस निरीक्षक विजय साळुंखे, पोलिस निरीक्षक शिरीष राठोड, पीएसआय आशिष रोही, पीएसआय नीलेश पाटील तसेच आठ ट्रान्सापेर्ट असोसिएशनचे पदाधिकारी व्यापारी उपस्थित होते.

ट्रान्स्पोर्टधारकांनादिलासा
प्रवेशबंदीच्या काळात कोणतेही जड वाहन शहरात येऊ नये त्यातून अपघात घडू नये, यासाठी वाहतूक शाखेच्या सर्व पथकांना गस्त घालण्याचे आदेश तूर्तास १५ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील १५ तारखेपर्यंत कुठल्याच प्रकारची कारवाई पोलीसांकडून होणार नाही, असे गावराने यांनी सांगितले. बुधवारी वाहतूक शाखेच्या पूर्व विभागाने एकट्या बियाणी चौकात सुमारे १४ वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली होती.

‘नोएन्ट्री’तही चालतात ट्रक
गांधीचौक ते राजापेठ दरम्यानच्या रस्त्यावर नो एन्ट्रीच्या वेळेतही ट्रक धावत असल्याने ते बंद करावेत, अशी मागणी मनपा स्थायी समितीचे सभापती मिलिंद बांबल यांनी केली आहे. सध्या नाे एन्ट्रीच्या या प्रस्तावावर हरकती सूचना मागवण्यात आल्या असून, त्या पार्श्वभूमीवर या मागणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

जुनाच वेळ कायम करण्यात यावा
पोलिसअधिका-याचा मृत्यू झाल्यावर पोलिस प्रशासनाने जी प्रस्तावित अधिसूचना काढली,ती अमान्य आहे. याचे शहाणपण पहिले त्यांना का नाही सुचले. शहरातील एन्ट्रीचा जुनाच वेळ योग्य आहे. पोलिस प्रशासन जो काही निर्णय घेईल, तो त्यांनी सर्व ट्रान्स्पोर्ट बांधवांना विश्वासात घेऊन करावा. सुनीलगुप्ता, अध्यक्ष, मालधक्का असोसिएशन.

आताच त्यांना का जाग आली
पोलिसअधिका-याचा अपघाती मृत्यू झाल्याने पोलिस प्रशासन जागे झाले आहे. आतापर्यंत इतके जनसामान्यांचा मृत्यू झाला, तेव्हा पोलिसांना का जाग आला नाही. ट्रान्स्पोर्ट धारकांना माहिती देता पोलिसांनी परस्पर ही कारवाई केली आहे. पोलिसांनी विश्वासघात केला आहे. जकीउल्ला खान, अध्यक्ष, चालक-मालक ट्रक असोसिएशन

१५ तारखेपर्यंत मुदत
झालेल्याबैठकीत बहुतांश मुद्दयांवर चर्चा करण्यात आली. ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे बरेचसे पदाधिकारी बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे १२ किंवा १३ फेब्रुवारीला बैठक घेऊन अंतीम निर्णय देण्यात येईल. सध्याची अधिसूचना ही प्रस्तावित असून कमी जास्त करुन मुद्यावर तोडगा काढण्यात येईल. मुद्दा निकाली काढेपर्यंत कुठल्याही वाहनावर कारवाई केली जाणार नाही. बी.के. गावराने, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-२.