आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Principal In 250 Collages Under Amravati University

विद्यापीठांतर्गत अडीचशे कॉलेजेसमध्ये अद्यापही नियमित प्राचार्यांची वानवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वारंवार सूचना दिल्यानंतरही सुमारे अडीचशेवर कॉलेजेसना अद्यापही प्राचार्यांची प्रतीक्षा आहे. नागपूर विद्यापीठाशी संलग्न कॉलेजेसमध्ये प्राचार्यांच्या नेमणुकीबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनंतर आता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने प्राचार्य नसलेल्या सर्व कॉलेजेसला ‘अल्टिमेटम’ दिला आहे.
विद्यापीठाशी संलग्न कॉलेजेसमध्ये प्राचार्य नसल्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने हरकत घेतली होती. विद्यापीठाशी संलग्नता कायम ठेवायची झाल्यास, नियमानुसार पूर्णवेळ प्राचार्य आणि प्राध्यापकांची नेमणूक बंधनकारक आहे; परंतु या नियमाला डावलून अनेक ठिकाणी प्रभारी प्राचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या नेमणुकींवर विद्यापीठाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे कॉलेजेसला पुढील शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी पूर्णवेळ प्राचार्य नेमणे बंधनकारक राहणार आहे.
प्राचार्य नसलेले कॉलेज
* अनुदानित 50
* विनाअनुदानित 200
‘अल्टिमेटम’ दिलाय
आम्ही कॉलेजेसला पूर्णवेळ प्राचार्य नेमण्याबाबत पत्र दिले आहेत. त्यांना- पुढील शैक्षणिक सत्रापर्यंत प्राचार्य नेमा; अन्यथा संलग्नता काढून घेतली जाईल, असे कळवले आहे. डॉ. अजय देशमुख, संचालक, बीसीयूडी