आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कमरेवरचे हात सोडूनी, आभाळाला लाव हात तू.!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोताळा - आषाढ महिना म्हटला की, विटेवर उभा असलेला विठ्ठल आणि संताच्या मांदीयाळीने गजबजून गेलेला चंद्रभागेचा तीर डोळ्यासमोर उभा राहतो. याच महिन्यात पाऊले पंढरीची वाट चालू लागतात. घरदार, लोभ, मोह, मत्सर सोडून भक्त विठ्ठलाच्या भेटीसाठी भगवी पताका घेऊन मार्गस्थ होतात. परंतु यंदा मात्र या मार्गाने जाताना पाऊल अचानक थबकते रणरणत्या उन्हात होरपळून जाणारी शेत शिवारे पाहिली की, मन पांडुरंगाला आर्ततेने साद घालू लागते की ‘पांडुरंगा क मरेवरचा हात सोडून आभाळा हात लाव व संपुर्ण माझा गाव भिजून टाक’. संपुर्ण महाराष्ट्रभर हेच चित्र असून पावसाने दडी मारल्याने मोताळा तालुक्यातील बळीराजाही चिंतातूर झालेला आहे. परंतु विठ्ठलापाशी प्रार्थंना केल्याशिवाय दुसरा पर्याय त्याच्याकडे शिल्लक उरलेला नाही.
जिल्ह्यातील मोताळा तालुका हा धुळ पेरणीसाठी प्रसिद्ध आहे. पाऊस येण्यापुर्वी तालुक्यामध्ये बर्‍याच ठिकाणी कोरडवाहूमध्ये पेरणी करण्यात येते. मात्र अनेकवेळा शेतकर्‍यांवर दुबार तीबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यामुळे धुळ पेरणीऐवजी पाऊस पडल्यानंतर पेरणी करायला शेतकर्‍यांनी तालुक्यामध्ये सुरुवात केली आहे.

साधारणत: मृग नक्षत्रामध्ये पेरणी करणे हे महत्वाचे मानले जाते. मात्र हे नक्षत्र संपत आले तरीही अद्यापपर्यंत पावसाचा थेंबसुद्धा तालुक्यात पडला नाही. मागील वर्षी पावसाळ्यामध्ये अतीवृष्टीने तर फेब्रुवारी मार्च मध्ये गारपीटीने शेतकर्‍यांना चांगलाच फटका बसला होता. यावर्षी अच्छे दिनची आशा शेतकरी वर्गाना लागली आहे. आभाळाकडे डोळे लावून असलेल्या शेतकर्‍यांचे मृग नक्षत्र हातचे गेले आहे. आता हे नक्षत्र संपून आद्रा नक्षत्र सुरु झाले आहे. मात्र अद्यापही पावसाचा पत्ता नाही. तो के व्हा येईल यांची शाश्वती नाही. त्यामुळे तालुक्यात सर्वात जास्त पेरा असलेले पीक घेण्याच्या मनस्थितीत शेतकरी नाहीत. कारण या पीकाला जास्त वेळ लागतो. परिणामी जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यास कमी वेळात येणार्‍या सोयाबीन, मका, यांचा पेरा चांगला होऊ शकतो. अशी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.

मागच्या वर्षी तालुक्यात जोमदार पाऊस पडला होता. जलसाठे आहेत या जलसाठय़ाच्या जोरावर तालुक्यातील शेतकर्‍यांनी कपाशी, मका, पिकांची पेरणी केली आहे. परंतु पाऊस नसल्याने याही पीकांचे आयुष्य आता धोक्यात आले आहे.
शेवटी नको पांडुरंगा मला सोन्या, चांदीचे दान रे।
फक्त भिजव पांडुरंगा, तहानलेले रान रे।।
एवढीच प्रार्थना केल्याशिवाय बळीराजाकडे दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नाही.