आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not A Bear, Dogs Were Trapped In Cage! Divya Marathi

अस्वल नव्हे, कुत्री अडकली पिंजर्‍यात!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- शहापूर शिवारामध्ये धुमाकूळ घालणार्‍या मादी अस्वलाला पकडण्यासाठी वनकर्मचार्‍यांनी लावलेल्या पिंर्ज‍यामध्ये दोन कुत्री अडकलीत. अस्वल अद्याप वनविभागाच्या ताब्यात न आल्याने त्याची दहशत कायम आहे.

शहापूर शिवारात मंगळवारी (दि. 6) सकाळपासून अस्वलाने धुमाकूळ घातला होता. प्रदीप पाटील यांच्या केळीच्या शेतात सर्वप्रथम राजू गभणे यांना अस्वल दिसले. त्याची माहिती देऊन वनकर्मचार्‍यांना पाचारण करण्यात आले. वनकर्मचार्‍यांनी दिवसभर अस्वलाला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. मात्र, अस्वल त्याकडे फिरकलेच नाही. दरम्यान, पिंजर्‍यता अस्वलाचे आवडते खाद्य मोहफुले पसरवण्यात आली आणि त्यावर रात्रीच्या सुमारास निगराणीसुद्धा ठेवण्यात आली. प्रकाश सोनोने, दिनेश वाट, सुरेश काळे हे रात्रीच्या गस्तीवर होते. पिंजर्‍यता पशू अडकल्याचे अंदाज येताच वनकर्मचार्‍यांनी पाहणी केली. मात्र, अस्वल नव्हे, पिंजर्‍यता दोन कुत्री अडकल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी हताशा व्यक्त केली आहे.