आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रक्तही आले आता महागाईच्या फेर्‍यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - खासगी रक्तपेढय़ा तसेच जिल्हा सर्वाेपचार रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये उन्हाळ्यामुळे रक्त संकलनामध्ये घट निर्माण झाल्याने येथील रुग्णांना रक्तपेढय़ांमध्ये चकरा माराव्या लागत आहेत. यातच शासनाने रक्ताच्या दरवाढीचा जी. आर. काढला असून, 350 एमएलच्या एका बॅगची किंमत 600 रुपयांनी वाढणार आहे.
शहरात सोबतच जिल्ह्यातील अकोट, मूर्तिजापूर, पातूर, बार्शिटाकळी आदी तालुक्याच्या शहरातील अपघातातील जखमींना येथील जिल्हा सर्वापचारमध्ये उपचारार्थ आणल्या जाते. या रुग्णांना रक्ताचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा सर्वाेपचार रुग्णालयात रक्त संकलन करण्यात येते. जिल्हा रुग्णालयात महिन्याला 450 ते 500 बॅगांचे संकलन होते. याव्यतिरिक्त खासगी रक्तपेढय़ांमध्येही रक्त संकलन करण्यात येते. परंतु, उन्हामुळे नागरिक रक्तदान करणे टाळत असल्याने मागील काही महिन्यांत रक्त संकलन कमी प्रमाणात होत आहे. असे असतानाच राज्य रक्त संकलन परिषद, मुंबईने प्रती बॅगमागे 600 रुपयांची वाढ केली आहे. रक्त संकलन कमी झाल्याने रुग्णांना आवश्यक तेवढे रक्त मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत रक्ताच्या किमतीत वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिकलसेल, थॅलेसिमिया यासारख्या आजाराने बाधित रुग्णांना तसेच पॉयझनिंग, अल्कोहोल तसेच अपघातातील गंभीर रुग्णांवर पडू शकतो.
350 एमएलच्या एका बॅगची किंमत 600 रुपये
जिल्हा रुग्णालयात महिन्याला 450 ते 500 बॅगांचे संकलन
उन्हामुळे रक्तदान करणे टाळत असल्याने संकलन कमी
राज्य रक्त संकलन परिषद, मुंबईने नुकत्याच काढलेल्या जी. आर. नुसार 350 मि.लि.ची एक बॅग 600 रुपयांनी महागणार आहे. या दरवाढीनुसार जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये 450 रुपयाला मिळणारी एक बॅग आता 1,050 रुपयांना, तर खासगी रक्तपेढीमध्ये 850 रुपयांना मिळणारी बॅग ही 1,450 रुपयांना मिळणार आहे.
रक्तपेढय़ांच्या बैठकीनंतर होणार दरवाढ
- राज्य रक्त संकलन परिषद, मुंबई ही परिषद महाराष्ट्रात रक्ताचे धोरण ठरवत असते. त्याअंतर्गत करण्यात आलेली दरवाढ शहरात अद्याप लागू करण्यात आली नाही. या दरवाढीबाबत शहरातील सर्व रक्तपेढी संचालकांच्या बैठकीनंतर करण्यात येणार आहे.’’ विवेक पिंपळकर, रक्तपेढी संचालक.