आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती गॅसची अाता अॅप्सवर करा ऑनलाइन बुकिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - घरगुतीगॅसची ऑनलाइन बुकिंग आता मोबाइल अॅप्सवरूनदेखील करता येणार आहे. घरगुती गॅस बुक करण्यासाठी खास ऑनलाइन गॅस बुकिंग हे अॅप्स तयार करण्यात आले आहे. प्ले स्टोअरवरून ग्राहकांना हे अॅप्स डाउनलोड करता येणार आहे. भारत, एचपी इंडेन असे घरगुती गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी गॅसधारक असलेल्या ग्राहकांना टोल फ्री नंबरवर सिलिंडर बुक करता येत होते. परंतु सध्या अॅप्समुळे ग्राहकांना ऑनलाइन गॅस बुकिंग करता येणार आहे.

न्यूरजिस्ट्रेशन कसे कराल?
न्यूरजिस्ट्रेशनसाठी ग्राहकांनी आपला कंझ्युमर नंबर, डिस्ट्रिब्युटर्स (नावाप्रमाणे स्थानाप्रमाणे) डिस्ट्रिब्युटरचे नाव याची माहिती दिल्यानंतर मेलद्वारे त्याला संदेश प्राप्त होतो. रजिस्ट्रेशन झाल्यावर ग्राहकांची संपूर्ण माहिती मेलमध्ये कस्टमर कन्सोल अॉप्शनमध्ये देण्यात आली आहे. मोबाइल नंबर तसेच आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही, अशी माहिती ग्राहकांना मिळेल.