आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी रोखण्यासाठी वापरणार आता मोक्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावतीजिल्ह्यात आजुबाजुच्या जिल्ह्यात चोरी, दरोडे अन्य गुन्हे करणाऱ्या टोळी सक्रीय झाल्या असतील तर त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी यापुढील काळात ग्रामीण पोलीसांकडून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी तयारी सुरू केली असल्याची माहीती पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी दिली आहे. लवकरच एका टोळी विरुद्ध माेक्कातंर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे सूतोवाच त्यांनी दिले आहे.

महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ (महाराष्ट कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राइम अॅक्ट १९९९) हा संघटीत गुन्हेगारांविरुध्द लावण्यात ये. अमरावती ग्रामीण पोलिस दलात मागील दहा वर्षांत तरी हा कायदा कोणत्याही गुन्हेगारी टोळी विरुध्द लावण्यात आलेला नाही मात्र वारंवार मोठ मोठ्या चोऱ्या किंवा दरोडे टाकणाऱ्या टोळी, ज्या टोळींिवरुध्द असे अनेक गुन्हे दाखल आहेत. अशा टोळी विरुध्द मोक्का लावण्यात येणार आहे. ग्रामीण पोलिसांच्या स्थनिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि. २९) धामणगाव रेल्वेला पकडलेल्या टोळी विरुध्द मोक्कातंर्गत कारवाई करता येणार आहे का? याची पडताळणी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांची दिले आहेत. यासोबतच काही टोळ्या या अमरावती सोबतच आजूबाजूच्या जिल्ह्यात जाऊन सुध्दा गुन्हे करतात, त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यातील पोलिसांशी संपर्क करून माहीती घेवून त्यांच्या मदतीने सुध्दा मोक्कातंर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

यासोबतच समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोलिसांनी जाऊन काम करायला पाहीजे. त्यामुळे पोलिसांविषयी सकारात्मक भावना निर्माण होते. शिवाय मोठ्या घटना थांबवण्यात यश येते. जिल्ह्यातील अवैध वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मोहीम राबविण्यात आली आहे. या दरम्यान अनेक वाहनचालक नियमांना सारून वाहतूक करत होते, त्यांच्या विरुध्द कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे पोलिस अधीक्षकांची सांगितले.

पोलिस महासंचालक कार्यालयाकडून करण्यात येणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या, पदोन्नती झालेल्या आहे. यामध्ये जिल्ह्यातून काही अधिकारी बाहेर गेलेत, काही बाहेरून जिल्ह्यात आले. आता लवकरच जिल्ह्याअंतर्गत पोलिस अधिकाऱ्यांच्या काही ठाणेदारांच्या बदल्या होणार आहे. याचवेळी एका अधिकाऱ्याची स्थानिक गुन्हे शाखेला नेमणूक करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...