आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरात आता स्वतंत्र ‘इन्व्हेस्टिगेशन टीम'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या प्रत्येक गंभीर गुन्ह्यांचा सखोल तपास होऊन दोषीस शिक्षा व्हावी, म्हणून प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र तपास पथक निर्माण करण्याचा निर्णय पोलिस महासंचालकांनी घेतला आहे. तसे आदेश त्यांनी राज्यभर पाठवले आहेत.
हे विशेष तपास पथक जुलै २०१५ पासून कार्यरत होणार आहे. यासाठी अमरावती पोलिस आयुक्तालयात तयारीला सुरुवात झाली आहे. पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या खून, बलात्कार, गंभीर स्वरूपाची हाणामारी, प्राणघातक हल्ला, हुंडाबळी यांसह अन्य गंभीर गुन्ह्यांमध्ये (सत्र न्यायालयात चालणाऱ्या प्रकरणांसाठी) पोलिसांकडून सखोल तपास होणे गरजेचे असते. मात्र, पोलिसांना तपासापेक्षा बंदोबस्त किंवा इतर कामांना अधिक महत्त्व द्यावे लागते. यामुळे कितीही गंभीर प्रकरण असले तरी पोलिसांना पूर्णवेळ तपासाला वेळ देणे शक्य होत नाही. त्याचा फटका अप्रत्यक्षपणे आरोपींना होणाऱ्या शिक्षेवर होतो. शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी तंत्रशुद्ध सखोल तपास आवश्यक आहे. त्यामुळे पोलिस महासंचालकांनी गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी प्रत्येक ठाण्यात स्वतंत्र तपास पथक नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी आवश्यक मनुष्यबळ त्या पथकाला तपासासाठी आवश्यक साधनसामुग्री पुरवण्याबाबत सूचना राज्यातील सर्वच जिल्हा आयुक्तालयांच्या प्रमुखांना दिलेल्या आहेत. तपास पथकांमध्ये सहभागी पोलिस अधिकारी कर्मचारी यांना कितीही महत्त्वाचा बंदोबस्त असला तरी बंदोबस्तासाठी वापरण्यात येऊ नये, त्यांना डीओ ठेवू नये. त्यांना गंभीर तपासा व्यतिरीक्त इतर कोणत्याही कामांसाठी वापरू नयेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. तपास पथक नेमण्यासाठी प्रत्येक ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन त्या आकडेवारीवरून वर्गवारी करण्यात आली आहे. या वर्गवारीनूसार प्रत्येक जिल्ह्यात आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलिस ठाण्यांची ए, बी, सी, डी अशा चार गटात वर्गवारी केली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, ‘तपास पथका'मध्ये कसे राहणार मनुष्यबळ...
बातम्या आणखी आहेत...