आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय पोषण आहारात आता दूधही!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- राज्यात अधिक उत्पादन झाल्याने शालेय पोषण आहारात आता दुधही दिले जाणार असल्याची माहिती आहे. राज्य शासनाकडे सद्यस्थितीत दोन लाख टन दूध पावडर शिल्लक आहे. याचा विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचे संकेत आहे.
शालेय पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा दुध देण्यात येणार आहे. याचा फायदा जिल्ह्यातील दोन हजारांपेक्षा अधिक शाळेतील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे. जिल्हा परिषद, नगर पालिका, महापालिका आणि खासगी अनुदानित शाळेतील पहिली ते पाचवी तसेच सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात येतो. यामध्ये विद्यार्थ्यांना तांदूळ, चटणी, तूर डाळ, मसूर डाळीसह नऊ प्रकारचे धान्य विभागून दिले जात होते. याचबरोबर आठवड्यातून एकदा पूरक आहारही दिला जात होता. यात आता दुधाचा समावेश करण्याचा प्रस्ताव दुग्ध विकास मंत्रालयाने तयार केला आहे.
यंदा एप्रिल ते जून महिन्यात दुधाचे विक्रमी उत्पादन झाल्याने दुधाची पावडर तयार करण्याशिवाय अन्य पर्याय राहिला नव्हता. आंतरराष्ट्रीय बाजारातही पावडरचे दर घसरल्याने अतिरिक्त उत्पादनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना देण्याचा मनोदय देखील दुग्ध विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखविला होता. शालेय पोषण आहारात दूध देण्याबाबत वित्त, शालेय, शिक्षण, ग्राम दुग्धविकास विभागात चर्चा सुरू आहे. चार ही विभागाचे एकमत झाल्यानंतर वित्त विभागाची मंजूरी मिळाल्यानंतरच तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाणार असल्याची माहिती आहे.
बातम्या आणखी आहेत...