आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनदायी योजनेचे कार्ड्स आता ‘सेतू’मधूनही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-स्वस्त धान्य दुकानांमध्ये अर्ज भरल्यावरही राजीव गांधी जीवनदायी योजनेचे कार्ड्स प्राप्त न झालेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कार्ड्सपासून वंचित राहिलेल्यांना आता सेतू, महा ई-सेवा केंद्र व टपाल कार्यालयांतून असे कार्ड्स प्राप्त करता येतील.
कार्ड्स नसल्याने पात्रतेचा पुरावा म्हणून संबंधित नागरिकांना पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड दाखवावे लागत. मात्र, हा पुरावा मान्य करताना काही दवाखान्यांमध्ये लाभार्थींपुढे अडचणींचा डोंगर उभा केला जायचा. शासनाच्या नव्या धोरणामुळे आता ही अडचण दूर झाली आहे. कुटुंबाचे संयुक्त छायाचित्र, रेशनकार्ड व जीवनदायी योजनेचा अर्ज दाखल केल्याची पोच एवढय़ा कागदपत्रांच्या आधारे संबंधितांना कार्ड्स प्राप्त करून घेता येतील.
एक लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणार्‍यांना राजीव गांधी जीवनदायी योजनेतून ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उत्पन्न र्मयादेतील कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या उपचाराची तरतूद या योजनेत समाविष्ट आहे. त्यासाठी शहरातील सुमारे 15 रुग्णालयांशी शासनाने करार केला असून, आतापर्यंत हजारो नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. सुर्शुषेपासून शस्त्रक्रियेपर्यंतच्या सुमारे 850 आजारांचा यामध्ये समावेश आहे.