आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायींची कत्तल करणाऱ्यांना आता विहिप शिकवणार धडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शासनानेसंपुर्ण राज्यात गोवंश हत्या बंदी लागू केली आहे. परंतु या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने छुप्या अवैध मार्गाने गायींची वाहतूक होत आहे. कत्तलीचे प्रमाण अजूनही सुरुच असून पोलिस प्रशासन याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करीत आहे. जिल्ह्यात गायींच्या हाेणाऱ्या अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले तर बजरंग दल विहीप आपल्या स्टाईलने गायींची कत्तल करणाऱ्यांना धडा शिकवेल, असा इशारा विहीपचे जिल्हाध्यक्ष विजय शर्मा यांनी पत्रपरिषदेत दिला.
दरम्यान, जेव्हापासून शासनाने हा कायदा लागू केला, तेव्हापासून गैरप्रकार मार्गाने गायींची अवैध वाहतूक होत आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी भागात गोवंश वाहतूक मांस विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे शर्मा यांनी सांगितले. शेंदूरजना घाट येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या अवैध गौवंश वाहतुकीवर लगाम लावण्यासाठी पुढाकार घेतला. तर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये दोन कार्यकर्ते गंभीर जखमी झाल्याचे शर्मा यांनी सांगितले.
याशिवाय गावातील काही समाजकंटकांनी एका समुदायाच्या घरावर गोटमार देखील केली. परंतु या सगळ्या घटनेकडे पोलिस प्रशासन हेतु परस्पर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विहीपने केला आहे. सरकारने गोवंश हत्या बंदी कायदा लागू केला. परंतु पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा कायदा अस्तित्वात आहे कि नाही, याच्या संभ्रमात असल्याचे विहीपचे म्हणणे आहे. शेंदूरजना घाट येथील घटनेसंदर्भात पोलिस प्रशासनाला विचारले असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. यामधील मुख्य सुत्रदार अजूनही फरार असून पोलिसांनी त्याच्यावर तत्काळ कारवाई केली नाही, तर बजरंग दल विहीप उग्र स्वरुपाचे आंदोलन करेल, असा इशारा कार्यकर्त्यांनी यावेळी दिला. याप्रसंगी पत्र परिषदेला विहीप बजरंग दलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

केकतपूर गोरक्षणात केले जातेय ३५० गोमातांचे रक्षण
विश्वहिंदू परिषदेतर्फे केकतपूर येथे गोरक्षण सुरु करण्यात आले आहे. ज्या गायींना कत्तलीसाठी घेऊन जाण्यात येते, अशा गायींची सुटका करुन त्यांना केकतपूर येथील गौरक्षणात ठेवण्यात येते. आतपर्यंत सुटका केलेल्या जवळपास साडेतीनशेहून अधिक गौमाता केकतपूर येथील गौरक्षणात आहेत. याठिकाणी या गोमातांची संपुर्ण काळजी घेतली जात असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांनीडागली पोलिस प्रशासनावर अाराेपांची तोफ
शेंदूरजनाघाट येथील घटनेपूर्वी अवैध गोवंश वाहतूक होत असल्याची माहिती सकाळी चार वाजता अमरावती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली होती. यामध्ये ते ट्रकमधून गोवंशची अवैध वाहतूक करण्यात आली. परंतु पोलिसांनी याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करुन कारवाई केली नसल्याची खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यापुढे पोलीसांकडून कारवाईला दिरंगाई झाली किंवा त्यांना हेतु परस्पर याकडे दुर्लक्ष केले तर विहीप बजरंग दल आपल्या स्टाईलने धडा शिकविले, असा इशारा कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिला.
बातम्या आणखी आहेत...