आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Number Of Marriages Going On In February Due To Water Shortage

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणीटंचाईमुळे फेब्रुवारीतच लग्नाची धूम, सर्वाधिक १२ विवाहमुहूर्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुसद - यंदासर्वत्र दुष्काळाचे सावट पसरलेले आहे. या दुष्काळामुळे दरवर्षीपेक्षा कमीच विवाह होणार आहेत. पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याने फेब्रुवारी महिन्यातच लग्न समारंभ आटोपून घेण्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या महिन्यात सर्वाधिक १२ लग्नतिथी आहेत.

दरवर्षी नोव्हेंबर ते जून या कालावधीत लग्न समारंभ मोठ्या प्रमाणावर होतात. याप्रमाणे लग्न मुहूर्तासाठी काही दिवसांपासून उपवर मुला-मुलींचे, आई-वडील आणि नातेवाईक लग्नतिथी काढण्यासाठी पंचांगकर्ते भटजींकडे गर्दी करत आहेत. मंगल कार्यालये, लॉन्स, बँड, घोडा, आचारी, मंडप, दागिने, कपडे, फोटोग्राफी, शूटिंग, पत्रिका आदी आवश्यक बाबींची आगाऊ नोंदणी करण्यात येत आहे. याशिवाय घरगुती लग्न समारंभासह हल्ली शहरात इव्हेंट मॅनेजमेंट अर्थात पॅकेज सिस्टिमने लग्न समारंभ पूर्ण केले जातात. त्या ठेकेदारांशी संपर्क करून अनेक परिवार बजेटनुसार बुकिंग करत आहेत. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये दहावी बारावीच्या परीक्षांचा हंगाम असल्याने अनेकांनी मे महिन्याच्या सुटीतील लग्नतिथी काढल्या आहेत. या वर्षी शुक्र अस्ताचा परिणाम असल्यामुळे विवाह मुहूर्त कमी आहेत. या वर्षी नोव्हेंबर ते जूनदरम्यान केवळ ५७ लग्नतिथी आहेत. त्यामुळे फेब्रुवारीतच जास्त लग्ने होणार आहेत.

पुढे वाचा तिथींविषयी..