आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Number Plate High Security Issue At Amravati, News In Marathi

नंबर प्लेट’ची हाय सिक्युरिटी गेली कुठे?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चोरी, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महत्त्वकांक्षी ठरणार्‍या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स (एचएसआरपी) योजना हवेतच विरली आहे. महानगरांतून सुरू होणारी ही योजना आजही अमरावतीत पोचलेलीच नाही. या योजनेचे काय झाले, त्याची स्थिती काय, याचे उत्तर कुणाजवळच नाही.

जिल्ह्यातील रस्त्यांवर सुमारे सव्वातीन लाख वाहने दररोज धावतात. त्यांपैकी अनेक वाहने वाहतुकीचे नियम मोडतात, काही चोरी होतात, तर काहींचा वापर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये केला जातो. या सर्वांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट हा प्रभावी तोडगा शोधण्यात आला होता. सुप्रीम कोर्टानेदेखील देशातील अनेक राज्यांना या नंबर प्लेट्स लावण्यात याव्यात, असे आदेश दिले होते. त्यासाठी डेडलाइनही देण्यात आली होती. राज्य शासनाने सुरुवातीला मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद या शहरांमध्ये व नंतर सर्व छोट्या शहरांमधील वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बसवण्यात येतील, असे जाहीर केले होते; परंतु मुंबई येथे झालेल्या घोषणेच्या अंमलबजावणीचा प्रवाह अनेक वर्षे लोटल्यावरही अमरावतीत पोचलेला नाही.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
‘एचएसआरपी’मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार होता. त्यानुसार कुणीही वाहतूक नियमांची पायमल्ली केल्यास पोलिसांना लेझर डिटेक्टरच्या माध्यमातून धावत्या वाहनांचे नंबरही टिपता येणे शक्य होणार होते. 1989 पासून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स लावण्याचा मुद्दा प्रलंबित होता. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी केल्यानंतर त्याला वेग आला.
अद्यापही आदेश नाहीत
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावल्या जाणार, ही बाब ऐकिवात आहे. मात्र, याबाबत लेखी स्वरूपात कोणतेही आदेश नाहीत. स्थानिक पातळीवरही त्याबाबत कोणतीही माहिती नाही. परिवहन आयुक्तालय किंवा राज्य शासनच याबाबत ठामपणे काय ते सांगू शकेल. श्रीपाद वाडेकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी