आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मारहाण केल्‍यामुळे परिचारिकांचे ‘काम बंद’ अंदोलन,

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पीडीएमसी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 55 वर्षीय व्यक्तीचा बुधवारी (दि. 18) मध्यरात्री मृत्यू झाला. वडिलाच्या मृत्यूला रुग्णालयातील परिचारिका जबाबदार असल्याचा आरोप करीत संतप्त मुलाने वॉर्डात कार्यरत परिचारिकेला थप्पड लगावली. या मारहाणीच्या निषेधासाठी पीडीएमसीच्या परिचारिकांनी गुरुवारी दुपारपर्यंत ‘काम बंद’ आंदोलन पुकारले होते. त्यानंतर परिचारिका पूर्ववत कामावर परतल्या.
र्शीराम बापूराव दयालकर (55, रा. खोलापूर)असे मृत रुग्णाचे नाव आहे. रक्तशर्करा कमी झाल्यामुळे त्यांना सोमवारी (दि. 16) पीडीएमसीमध्ये आयसीयू कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान बुधवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. वडिलांच्या उपचारात डॉक्टर व परिचारिकेने हयगय केली, असा आरोप मुलगा र्शीकांतने करून तेथील परिचारिकेला थप्पड लगावली. यानंतर डॉक्टरांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी इर्विनला पाठवला; तसेच संबंधित परिचारिकेने र्शीकांतविरुद्ध गाडगेनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी परिचारिकेच्या तक्रारीवरून र्शीकांतविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती गाडगेनगरचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र नाईकवाड यांनी दिली.

मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी रुग्णालयातील परिचारिका वैद्यकीय अधीक्षक कार्यालयासमोर जमल्या. त्यांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय अधीक्षक डॉ. वसंत लवणकर यांना कळवला. र्शीकांतविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करावी; तोपर्यंत कामावर परतणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. रुग्णालयात एकूण 130 परिचारिका असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोषींवर कारवाई करू
थप्पड लगावल्याची तक्रार परिचारिकांनी आमच्याकडे केली आहे. आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची त्यांची मागणी आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यासाठी योग्य त्या सूचना करण्यात येतील. डॉ. सोमेश्वर निर्मळ, अपर वैद्यकीय अधीक्षक, पीडीएमसी रुग्णालय.