आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गाने बेघर केले, शासकीय व्यवस्थेने ठोकरले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नियतीनंपोट भरण्यासाठी दोन हात दिलेल्या कबले कुटुंबीयांचे हक्काचे छप्पर निसर्गाने जमीनदोस्त केले. ग्रामपंचायतीच्या व्हऱ्हांड्यात आश्रय घेतलेल्या या कुटुंबाची निवाऱ्यासाठी शासनदरबारी पायपीट सुरू आहे. चार महिन्यांच्या बाळंतीणीसह आणखी किती दिवस व्हऱ्हांड्यात काढावे, असा सवाल त्यांनी व्यवस्थेसमोर उभा केला आहे.
मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये जनुना (ता. नांदगाव खंडेश्वर) येथील देिवदास कबले यांचे घर जमीनदोस्त झाले. भूमिहीन असलेल्या देविदास कबले यांच्या कुटुंबीयांमध्ये मोठा मुलगा संदीप, लहान नीलेश, चार महिन्यांची बाळंतीण सून, चार महिन्यांचा मुलगा मंगेश, दोन वर्षांची मुलगी श्रेया, पत्नी अन्नपूर्णाबाई असा परिवार आहे. मजुरीवर पोट भरणे हाच त्यांचा व्यवसाय आहे. घर कोसळल्यानंतर कबले कुटुंबीयांनी ग्रामपंचायतीच्या वऱ्हांड्यात आश्रय घेतला आहे.
प्रशासनाच्या वतीने त्यांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली; परंतु ही मदत किती दिवस पुरणार, हा प्रश्न आहे. दरम्यान, घर दुरुस्तीसाठी आर्थिक मदत किंवा एखादे घरकुल मिळावे, या मागणीसाठी कबले कुटुंबीय जिल्हािधकाऱ्यांच्या दारात २० ऑगस्ट रोजी मदतीसाठी आले होते. आपली आपबिती त्यांनी जिल्हािधकाऱ्यांच्या कानावर घातली. घर दुरुस्तीसाठी मदत मिळावी, यासाठी तहसीलदारांपासून राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दारापर्यंत पायपीट केली; परंतु काहीही उपयोग झाला नसल्याचे मुलगा नीलेश याने सांगितले.
सातिदवसांत अहवाल द्या : कबलेकुटुंबीयांनी जिल्हािधकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर त्यावर तहसीलदारांनी तातडीने योग्य कारवाई करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचा शेरा २० ऑगस्ट रोजी लिहिला आहे; परंतु आज सहा दिवस उलटूनही कुणीच आले नसल्याचे नीलेशने सांगितले.

सरपंच,सदस्यांच्या धमक्या : ग्रामपंचायतीतआश्रय घेतल्यामुळे सरपंच सदस्यांकडून हाकलून देण्याच्या धमक्या मिळत असल्याचे नीलेशने सांगितले. घर नसलेल्या अवस्थेत आम्ही जावे कुठे, असा सवाल त्याने उपस्थित केला.
कबलेयांचे घर पडल्यानंतर त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी बीडीओ, तहसीलदार,जि.प. सदस्यांकडे प्रयत्न केला. घरकुलाची प्रतीक्षा यादी पाठवण्यात आली आहे. या यादीत नाव समािवष्ट करण्यासाठी बीडीओंनाही भेटलो. परंतु त्यांनी यात काहीच करता येत नसल्याचे सांगितल्याने नाव समािवष्ट करता आले नाही. शासकीय मदत मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला. चकोरसुने, सरपंच,जनुना