आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Officers And Employees Of Nationalized Banks Strike Issue

बँकांचा संप : ४५० कोटींचे व्यवहार ठप्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सुधारितवेतन कराराच्या मागणीसाठी राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि. १२) पुकारलेल्या एकदिवसीय संपामुळे शहरातील ४५० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. युनायटेड फोरम बँक युनियनच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात बँक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण नऊ संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज दिवसभर ठप्प झाले होते.

राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्या वेतनाची दर पाच वर्षांनी पुनर्रचना केली जाणे अपेक्षितआहे. असे असले तरीही २००७ मध्ये निश्चित झालेल्या वेतनाची अद्याप पुनर्रचना झालेली नाही. ही पुनर्रचना नोव्हेंबर २०१२ मध्ये होणे अभिप्रेत होते. मात्र, अजूनही शासनाने याबाबत निर्णय घेतला नाही. या मागणीसाठी यापूर्वी बँक कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी शासनासोबत चर्चा केली. मात्र, शासनाकडून त्या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. वेतन पुनर्रचना या मुख्य मागणीसोबतच सध्या पाहिजे त्या प्रमाणात बँकांमध्ये नोकरभरती होत नाही. यामुळे कमी मनुष्यबळात काम करताना कामाचा व्याप परिणामी ताण वाढला आहे. मागण्यांसंदर्भात शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा, यासाठीच बुधवारचा एकदिवसीय संप पुकारण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सर्वसामान्यांना फटका
बुधवारीबँका बंद राहिल्याने कोणतेच कामकाज होऊ शकले नाही. या बंदचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. अमोलदेशमुख, अमरावती.

मागणीमान्य करावी
दरपाच वर्षांनी वेतन पुनर्रचना करणे आवश्यक आहे. मात्र, २००७ पासून वेतन पुनर्रचना झाली नाही. त्यामुळेच युनायटेड फोरम बँक युनियनमध्ये सहभागी सर्व संघटनांनी बंद पुकारला होता. बुधवारी शहरातील ६० राष्ट्रीयीकृत बँका बंद होत्या, त्यामुळे जवळपास ४५० कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याचा अंदाज आहे.

पाच डिसेंबरला पुन्हा बंदची हाक
आगामीकाळात वेतन पुनर्रचनेविषयी निर्णय अन्य मागण्या पूर्ण झाल्यास पुढील महिन्यात पुन्हा एकदिवसीय संप पुकारण्याचा निर्णय युनायटेड फोरम बँक युनियनने घेतला आहे. त्या वेळी देशभरातील सर्व बँॅका एकाच दिवशी बंद ठेवता पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण झोननुसार वेगवेगळ्या दिवशी बंद ठेवल्या जाणार असून, अमरावतीच्या बँकांचे कामकाज पाच डिसेंबरला बंद राहणार आहेत.