आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरे व्वा! वीज झाली स्वस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- वीजनियामक आयोगाने राज्यात विजेचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला असून जून महिन्यापासून हे नवे दर लागू झालेले आहेत. यासोबतच अमरावती शहरात वीज देयकांवर लागणारा टक्के एलबीटीसुध्दा हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. विद्युत नियामक आयोगाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील पाच लाखांवर वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
विद्युत नियामक आयोगाने सर्वच प्रकारच्या वीज ग्राहकांसाठी विजेचे दर कमी केले आहेत. यामध्ये सर्वाधिक फायदा हा औद्योगिक ग्राहकांना झालेला आहे. कारण घरगुती, व्यावसायिक कृषी यांच्या तुलनेत उद्योगासाठी लागणाऱ्या विजेच्या दरात भरीव कपात झाल्याचे नविन दरांवरून दिसून येत आहे. वीज दरवाढीमुळे दारिद्र्य रेषेखालील वीज ग्राहकांपासून ते उद्योग क्षेत्रातील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
या निर्णयानूसार महिन्याकाठी ते ३०० युनिट वीज वापर करणाऱ्यांनाच दर कमी झाले आहेत. मात्र ३०१ युनिट पासून जास्त वापर करणाऱ्यांसाठी विजेचे दर काही प्रमाणात वाढलेले आहे. यामध्ये मात्र सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांना फायदा आहे. मात्र घरगुती ग्राहकांना दर महिन्यासाठी ४० रुपये द्यावा लागणार स्थिर आकार यापुढे ५० रुपये द्यावा लागणार आहे. स्थिर आकारावर १० रुपये अधिक माेजावे लागावे लागणार आहे. याचवेळी औद्योगिक क्षेत्रातील सरसकट वीज ग्राहकांना प्रतियुनिटवर ४० पैशांपासून ते १.७७ पैश्यापर्यंत दर कमी झालेले आहे. तसेच व्यावसायिक वीज ग्राहकांना ७० ते ४१ पैश्यांपर्यंत प्रतीयुनिट कमी झालेले आहे. तसेच दिवाबत्तीसाठी ग्रामपंचायकडून वसूल करण्यात येणाऱ्या वीज दरात प्रतीयुनिट २४ पैसे तर महापालिकेकडून प्रतीयुनिट २२ पैसे कमी करण्यात आलेले आहे.

अमरावती जिल्ह्यात सध्यस्थितीत लाख ८८३ विजग्राहक आहेत. त्यापैकी लाख ४१ हजार ५६६ विजग्राहक अमरावती शहरातील आहेत. अमरावती जिल्ह्यात मे २०१४ ते एप्रिल २०१५ या वर्षभराच्या कालावधीमध्ये तब्बल हजार ५०६ लाख युनिट घरगुती वीज ग्राहकांकडून वीज वापरण्यात आलेली आहे. त्यापैकी हजार ९१९ हजार युनिट वीज ही शहरात वापरल्या गेली आहे. याचवेळी ६६५ लाख युनिट वीज ही व्यावसायिकरित्या वापरली गेली असून त्यापैकी ४०९ लाख युनिट ही शहरात वापरलेली आहे. उद्योगासाठी ७०८ लाख युनिट वीज वापरली आहे.
पुर्वीचे दर नवीन दर घरगुती ते१०० युनिट ४.१६ ३.७६
१०१ ते ३०० युनिट ७.३९ ७.२१
३०१ ते ५०० युनिट ९.५९ ९.९५
५०० ते १००० युनिट १०.६० ११.३१
१००० युनिट पासून पुढे ११.३८ १२.५०
औद्योगिकते२० किलोवॅट ६.१५ ५.५१ २० किलोवॅट पेक्षा जास्त ८.७५ ६.९८
व्यावसायिकते२० किवॅ ७.३० ६.६० ते २०० किलोवॅट १०.६१ १०.२०
दिवाबत्तीग्रा.पं.न.प.(अ,ब,क) ५.०२ ४.७८
महानगरपालिका६.०४५.८०
विद्युत नियामक आयोगाने वीज दर कमी केले आहे. याचा फायदा सर्वच वीज ग्राहकांना होणार आहे. कमी झालेल्या दरानुसार ग्राहकांना जून महिन्यांपासून देयक देण्यात येतील. (जून महिन्यापासून याचा जून नव्हे तर समजा देयक कालावधी हा १५ जून ते जुलै असेल तर १५ जूनपासून ) याचवेळी अमरावतीकरांच्या देयकांवर आकारण्यात येणारा एलबीटी जवळपास रद्द करण्यात आला आहे. त्याबाबत लवकरच अंतिम निर्णय होणार आहे. आकाश नारे, वित्त लेखा अधिकारी, महावितरण कंपनी, अमरावती.

वीज दरात काही प्रमाणात दर कमी झालेले आहे. मात्र याचवेळी स्थिर आकारांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. घरगुती ग्राहकांसाठी आतापर्यंत असलेला ४० रुपये स्थिर आकार ५० रुपये झाला आहे. याचवेळी थ्री फेज ग्राहकांना यापुर्वी १३० रुपये स्थिर आकार होता तो वाढून १५० रुपये झाला आहे. तसेच व्यावसायिक ग्राहकांना लागणारा १९० रुपयांवरून २२० रुपये स्थिर आकार झालेला आहे. त्यामुळे एकिकडे वीज दर कमी झाल्याचे दिसत असले तरी सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बचत होणार नाही, असे दिसत आहे.