आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • On Road Young Lady And Men Fight Issue At Amravati

शहरात भररस्त्यातच झाली युवक, युवतीची ‘फ्री स्टाइल’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - एकमेकांच्या परिचीत असलेल्या युवक युवतीमध्ये रस्त्यात शाब्दीक वाद झाला. या वादानंतर संतप्त युवक युवतीची रस्त्यावरच फ्री स्टाईल झाली. या प्रकारानंतर दोघेही जवळच असलेल्या पोलिस ठाण्यात पोहोचले होते. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता. शहरातच राहणाऱ्या एका युवतीने काही महिन्यापुर्वी परिचयातील युवकाविरुद्ध अत्याचाराची तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणी पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणावरून गुरूवारी सायंकाळी शहरातील एका मुख्य रस्त्यावर हे दोघे एकमेकांना दिसले. सुरूवातीला यांच्यात बाचाबाची झाली. एक मुलगा मुलगी भांडत असल्याचे दिसल्यामुळे बघ्यांची गर्दी जमली. काही वेळानंतर शाब्दीक बाचाबाची थेट हाणामारीवर पोहचली. काही नागरिकांना पुढाकार घेऊनच हा वाद थांबवला.