आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच कक्षाला लावले दोन कुलूप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - डाॅ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डीनच्या खुर्चीचा वाद आता प्रतिष्ठेचा बनला असून, डीनपदासाठी झगडणाऱ्या दोन्ही दावेदारांनी मंगळवारी डीन कक्षाला आपापले कुलूप लावले. त्यामुळे एकाच कक्षाला अधिकारप्राप्तीसाठी लागलेले दोन कुलूप सध्या शहरातील शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

डाॅ. जाणे यांनी सोमवारी डीनच्या कक्षाला कुलूप लावल्यामुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आदेशानुसार रुजू झालेले डाॅ. पद्माकर सोमवंशी यांना परत जावे लागले होते. मंगळवारी डाॅ. सोमवंशी सकाळी महाविद्यालयात पोहोचले, तेव्हा त्यांना कक्षाला कुलूप दिसले. त्यांनी स्वत:जवळील कुलूप दरवाजाला लावून चावी स्वत:जवळ ठेवली. त्याचप्रमाणे ऑर्डरची कॉपी चिकटवून अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे एकाच दरवाजाला दोन कुलूप असे चित्र बघायला मिळाले. सोमवारी डॉ. जाणे यांच्या आदेशाने कुलूप उघडण्यात आल्यानंतर ते कक्षात जाऊन बसले होते. यावर डाॅ. सोमवंशी यांनी ताेडगा शोधून मंगळवारी स्वत:चे कुलूप आणून डीन कक्षाला लावले आहे.