आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाने देहदानाचा तर ६१ जणांनी केला नेत्रदानाचा संकल्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- दिशा एज्युकेशन फाउंडेशन दिशा आय बँकेच्या वतीने ‘रोशनी जिंदगी मै’ ही नेत्रदान जनजागृती मोहीम महाराष्ट्रभर सुरू आहे. या मोहिमेंतर्गत शेगाव नाका भागातील ६१ जणांनी नेत्रदानाचे अर्ज भरून दिले. याशिवाय एका व्यक्तीने देहदानाचा संकल्प केला आहे.
दिशा फाउंडेशनतर्फे शहरातील शेगाव नाका चौक येथे नेत्रदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत ट्रॅफिक सिग्नलवर नागरिक थांबले असताना त्यांना नेत्रदानाबद्दल माहिती देऊन त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यात आले. त्यानुसार ६१ जणांनी तसा संकल्प केला. शिवाय एका व्यक्तीने थेट देहदानाचा अर्जही भरुन दिला.

दिशा ग्रुपचे सचिव स्वप्निल अरुण गावंडे यांनी त्यांना ही माहिती दिली. या वेळी गावंडे यांच्यासह अनुजा इंगळे, रवींद्र जोगळेकर, नेहा जोगळेकर, अनुजय भगत, निशांत देशमुख, श्वेता सराफ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
नेत्रदानाबाबत माहिती देताना दिशा आय बँकेचे पदािधकारी कार्यकर्ते.

जिल्ह्यातील एकमेव मान्यताप्राप्त संस्था
दिशाआय बँक हि मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यांतर्गत मान्यताप्राप्त असलेली जिल्ह्यातील एकमेव सक्रीय नेत्र पेढी आहे. दिशा ग्रुपतर्फे दरवर्षी सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये नेत्रदान मोहीम घेतली जाते. विशेष असे की युवक-युवती या कामासाठी धडपड करत आहेत.

जगभरात अंधांची संख्या ३९ दशलक्षच्या घरात
जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्व्हे नुसार जगात २८५ दशलक्ष लोकांना दृष्टी नाही. त्यापैकी ३९ दशलक्ष लोक हे कायमचे अंध आहेत २४६ दशलक्ष लोकांची दृष्टी कमी आहे. जागतिक पातळीवर अंधत्वाचे प्रमाण ५८ टक्के आहे. त्यातील ४५ ते ५९ या वयोगटातले नागरिक ४५ टक्के आहेत, टक्के नागरिक १५ ते ४४ या वयातले आहेत तर टक्के अंधत्व हे वर्षापेक्षा कमी वयोगटाचे आहे.
बातम्या आणखी आहेत...