आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्याने केला शेतक-यांचा वांदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मध्यंतरी कांद्याचे भाव शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात कांद्याची लागवड केली. मात्र, लागवडीनंतर झालेली गारपीट व आता काढणीच्या वेळी पडणार्‍या अवकाळी पावसाच्या सरी व ढगाळ वातावरणामुळे कांदा सडण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतात काढलेल्या कांद्याच्या ढिगार्‍याची दररोज छटाई करून सडलेला शेकडो क्लिंटल कांदा फेकावा लागत आहे. निसर्गाच्या या अवकृपेमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, कांद्याने शेतकर्‍यांचा वांदा केल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात पहावयास मिळत आहे.
कांदा हा सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन आहारातील अविभाज्य घटक आहे. अनेकांच्या जेवणातील भाजीला चव देणारा हा कांदा शेतकर्‍यांना मात्र प्रतिकूल वातावरणामुळे रडवत आहे. मोर्शी तालुक्यात 50 ते 60 हेक्टर क्षेत्रात कांद्याची लागवड केली जाते. एक एकरातील कांदा लागवडीपासून काढणीपर्यंत 40 ते 42 हजार रुपये खर्च येतो. साधारणत: एका एकरात 60 ते 70 क्विंटल कांद्याचे उत्पन्न होते. मागील वर्षी हाच कांदा 900 ते 1200 रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे शेतकर्‍यांनी विकला होता. परंतु, यावर्षी शेतकर्‍यांचा कांदा बाजारात येताच भाव घसरल्याने शेतक र्‍यांना प्रतिक्विंटल 700 ते 800 रुपये भाव मिळत आहे. बाजारात कमी भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांचा लागवडीचा खर्चही निघत नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
एरवी तेजीत असलेला बाजारभाव शेतकर्‍यांचा माल विक्रीसाठी येताच भाव कमी होतात. त्यामुळे मिळेल त्या भावात शेतकर्‍यांना आपला माल विकण्याशिवाय पर्याय नसतो.