आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूस धरणात आता उरला केवळ 18 टक्के साठा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुसद - मान्सून कोरडा गेल्याने शेतक-यांचा खरीप हंगाम हातातून जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षी जून महिन्यात पूस धरण ओव्हरफ्लो झाले होते. मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने पूस धरणात सद्यस्थितीत केवळ 1८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळाचे चिन्ह दिसू लागले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल 350 मि.मी. पाऊस कमी झाला.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाच गावांना आजही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. रब्बी हंगामात गारपिटीसह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. आता पावसाळ्यातील तीनही नक्षत्र कोरडे गेल्याने तालुक्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. यंदा फेब्रुवारी ते 15 मे या कालावधीत कधी नव्हे तो प्रचंड पाऊस झाला. मोठ्या प्रमाणात झालेल्या या गारपिटीने रब्बी हंगाम वाया गेला. उन्हाळ्यात शेतक-यांचा कर्दनकाळ ठरलेल्या या पावसाने पावसाळ्यात मात्र चांगलीच दडी मारली आहे.

जिल्ह्यात सरासरी ८13 मि.मी. एवढा पाऊस पावसाळ्यात पडतो. मागील वर्षी जून महिन्यातच पुसद तालुक्यातील पूस धरणासह गाव तलाव, शेततळे, वनतळे, विहिरी, इंधन विहिरी व अन्य पेयजलांचे स्रोत तुडूंब भरले होते. यावर्षी मात्र अद्यापही पावसाने पाहिजे तशी हजेरी न लावल्याने पाण्याचे स्रोत आटले आहेत. मागील वर्षी 14 जून रोजी ओव्हरफ्लो झालेल्या पूस धरणात यावर्षी केवळ 1८ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पुसद तालुक्यात काºहोळ, अनसिंग, उल्हासवाडी, म्हैसमाळ, नारवाडी या पाच गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. प्रशासनाने तलावामध्ये असलेले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवलेले आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
पाण्याचा अपव्यय टाळल्यास काही दिवस सुरळीत पाणी
४पाऊस लवकर आला नाही तर पूस धरण भरणार नाही. या धरणातूनच शहराला पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरणात जलसाठा कमी आहे. त्यानंतरही नियोजन करून आम्ही शहरासह परिसरातील नागरिकांची तहान भागवण्याचा प्रयत्न करत आहो. नागरिकांनीही पालिकेला साथ देऊन पाण्याचा अपव्यय टाळावा. पाण्याचा अपव्यय टाळल्यास निश्चित आणखी काही दिवस सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकेल.’’ राजू दुधे, सभापती पाणीपुरवठा, नगर परिषद, पुसद

पाणीपुरवठा योजनांना घरघर,अनेकांचे स्थलांतर
अनेक ठिकाणच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांनाही आता घरघर लागली आहे. गांभीर्याची बाब म्हणजे काही ठिकाणी पाणी मिळणेही दुरापस्त झाले आहे. यातच जून महिना संपला तरीसुद्धा पाऊस न आल्याने अनेकांनी स्थलांतरण केले आहे. मजुरांना रोजगार नाही. शेतक‍-यांचीही आर्थिक स्थिती बिघडली आहे. शाळा, महाविद्यालयांना सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांचे महागडे साहित्य कसे खरेदी करावे, याची काळजी शेतक-यांना लागली आहे.