आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Only One Devotee Of Hanuman Pull Nine Vehicle Rath

एकट्या हनुमान भक्ताने ओढला नऊ गाड्यांचा रथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चिक्कार गर्दी असलेला नऊ बैलगाड्यांचा रथ एका हनुमान भक्ताने क्षणार्धात ओढला. रोमांच तसेच अंगावर शहारे आणणारा क्षण बडनेरा येथील जुनी वस्ती परिसरात हजारो नागरिकांनी शनिवारी (दि. ४) प्रत्यक्ष अनुभवला. तब्बल ७५ वर्षांपूर्वी सुरू झालेली गाड्या ओढण्याची ही परंपरा हनुमान जयंतीच्या पर्वावर येथे नित्यनियमाने जोपसली जात आहे. पाच वर्षांचे कडक व्रत करण्याचा दृढ निश्चय करणाऱ्या हनुमान भक्तालाच गाड्या ओढण्याचा हा मान मिळतो.

िमनी बायपासलगत कोंडेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तब्बल ४०० ते ५०० मीटरपर्यंत गाड्या ओढण्याचा हा कार्यक्रम होतो. रेल्वे फाटकाजवळच्या आसरा माता मंिदरापासून सुरू झालेला हा थरार हनुमान मंदिराच्या पायऱ्यापर्यंत कायम राहतो. नऊ बैलगाड्यांचा रथ सागर रत्नाकर अंबाडकर या हनुमान भक्ताकडून या वर्षी ओढण्यात आला.

आशीर्वादाने कार्यसिद्धी
कोणत्याहीकार्याप्रती आस्था असणे गरजेचे आहे. आस्था असली, की भक्त म्हणून गाड्या ओढण्याचे कार्य पूर्णत्वास येते. शेकडो नागरिक चढून असलेल्या बैलगाड्यांच्या रथाला एकट्याने खेचणे अशक्य आहे. मात्र, हनुमंतांच्या आशीर्वादाने गाड्या ओढल्या जातात.भाविकांची श्रद्धा आणि अनेक वर्षांची परंपरादेखील अखंडित सुरू आहे. राजूलाड, पूर्वीगाड्या ओढलेले भक्त

मोठा धार्मिक कार्यक्रम
हनुमानजयंतीनिमित्त बडनेरात गाड्या ओढण्याचा हा कार्यक्रम संपूर्ण ग्रामस्थ मिळून साजरा करीत असल्याने याला धार्मिक कार्यक्रमाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सात दिवसांच्या सप्ताहानंतर हनुमान जयंतीदिनी सायंकाळी दर्शन घेतल्यानंतर हनुमान भक्ताकडून नऊ गाड्यांचा रथ ओढला जातो. किशोरअंबाडकर, अध्यक्ष,बारी पंचायत ट्रस्ट

वर्षे ब्रह्मचर्याचे व्रत
हनुमानजयंतीच्या पर्वावर गाडे ओढण्याचा निश्चय केल्यानंतर पाच वर्षांपर्यंत ब्रह्मचर्याचे कडक व्रत हनुमान भक्ताला करावे लागते. गाडे ओढण्यासाठी हनुमंत भक्त हा अविवाहित असणे गरजेचे आहे. पाच वर्षांच्या कडक व्रताशिवाय हनुमान जयंतीच्या पर्वावर सात दिवसांपर्यंत उपासनादेखील करावी लागते. कडक व्रत करण्यास तयार असलेल्या भक्तालाच गाड्यांचा रथ ओढण्याचा मान मिळतो.

एकच भक्त ओढतो पाच वर्षांपर्यंत गाडे
एकाचभक्ताला तब्बल पाच वर्षांपर्यंत नऊ बैलगाड्यांचा रथ ओढावा लागतो. यावर्षी सागर अंबाडकर या भक्ताला हा मान मिळाला. सागर हा मागील दोन वर्षांपासून गाडे ओढत असून, यावर्षी त्याचे हे तिसरे वर्ष होते. आगामी दोन वर्षांपर्यंत त्यालाच परंपरेनुसार गाडे ओढण्याचा मान मिळणार आहे.