आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेतील विरोधी पक्षनेता बदलणार! शिवसेनेचे महानगरप्रमुख दिगंबर डहाकेंची वर्णी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - प्रा.प्रशांत वानखडे यांच्याकडून महापालिकेचे विरौधीपक्षनेतपद जाणार असून त्यांच्याजागी शिवसेनेचे महानगर प्रमुख िदगंबर डहाके यांची वर्णी लागणार आहे. डहाके यांना पक्षाकडून याबाबत मंगळवारी पत्र प्राप्त झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

शिवसेनेचे राजापेठ प्रभागातील नगरसेवक प्रा. प्रशांत वानखडे यांच्याकडे मागील अडीच वर्षांपासून महापालिकेचे विरौधीपक्षनेतेपद आहे. महापौर, उपमहापौर तसेच पक्षनेतेपदांची नव्याने निवड झाली. त्यामुळे, विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती करण्याबाबत शिवसेनेकडून पत्र देण्यात आल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. पालिकेतील नगर सचिवांना पक्षाकडून प्राप्त झालेले पत्र सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येते. महापौरांकडून विरोधी पक्षनेत्याच्या नावांची घोषणा होणे गरजेचे आहे. विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ हा एक वर्षांचा असतो, मात्र प्रा. प्रशांत वानखडे यांनी तब्बल अडीच वर्ष हे पद भूषविले आहे.

डहाके यांच्याकडे खासदार आनंदराव अडसूळ यांनी विरोधी पक्षनेते पदाचा भार सोपविण्याबाबत सोमवारी (१५ सप्टेंबर) पत्र दिले आहे. जिल्हा प्रमुख संजय बंड, महानगर प्रमुख दिगंबर डहाके तसेच विरोधी पक्षनेते प्रा. प्रशांत वानखडे, हे बडनेरा विधानसभा मतदारसंघातून दावेदार आहेत. बडनेरा मतदारसंघातील दावेदारी कमी व्हावी म्हणून खासदारांकडून दिगंबर डहाके यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याची राजकीय खेळी खेळण्यात आली असावी, असा अंदाजही राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.