आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘केम’च्या ‘आपुलकी’ने संत्रा ३० हजार रुपये टन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सध्याशेतकऱ्यांच्या धुऱ्यावर संत्र्याला दहा हजार रुपये प्रती टनानेही कुणी विचारेनासे झाले आहे. व्यापारीही बागांकडे फिरकेनासा झाला आहे. संत्रा उत्पादकांची व्यापाऱ्यांच्या कचाट्यात होणारी ही पिळवणूक थांबवण्यासाठी ‘केम’च्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. या शेतकऱ्यांना पुण्यात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली. जिल्‍हृयातील ६० संत्रा उत्पादकांनीही छातीला माती लावून शेतात बेभाव विकला जाणारा संत्रा पुण्यात प्रती ३० हजार रुपये टनाने विकला.

विदर्भातील सहा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत ‘केम’ (समन्वयीत कृषी विकास प्रकल्प, कृषी समृद्धी) काम करते. बेभाव विकल्या जाणाऱ्या या संत्र्याच्या विक्रीसाठी ‘केम’ प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील काही गावांतील शेतकऱ्यांनी समूह तयार केले आहेत. दरम्यान, स्थानिक बाजारपेठेत संत्र्याचे भाव पडले. दहा लाखांची बाग पाच लाख रुपयांना विकली जात नसल्याचे चित्र सध्या जिल्‍हृयात आहे. भाव घसरल्यामुळे व्यापारीही बागांकडे फिरकत नसल्यामुळे मेहनतीचे फळ बेभाव विकण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. याचवेळी ‘केम’चे प्रकल्प संचालक रवींद्र ठाकरे यांनी महाराष्ट्र कृषी पणन महामंडळासोबत चर्चा करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पुण्याच्या बाजारपेठेत जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नाने पुण्यातील गुलटेकडी बाजारपेठेत संत्रा उत्पादकांना जागा मिळाली. २० डिसेंबरला जिल्‍हृयातील संत्रा घेऊन जाणारे पहिले वाहन विक्रीसाठी पुण्यात पोहोचले.

-यंदा स्थानिक बाजारात संत्र्याचे भाव पडले आहेत. अशावेळी ‘केम’ने पुढाकार घेऊन पणन महामंडळ, कृषी विभाग, ‘आपुलकी’च्या मदतीने शेतकऱ्यांना पुण्यात बाजारपेठ उपलब्ध करून दिली. स्थानिक बाजाराच्या तुलनेत तिप्पट दर मिळत आहे. ‘केम’ने शेतकऱ्यांना माफक दरात राहण्याची व्यवस्था करून दिली. त्यामुळे आतापर्यंत ५३ टन संत्रा विकला. रविवारी पुन्हा आठ टन संत्रा जाणार आहे. ही सुरुवात शेतकऱ्यांसाठी आशादायी आहे. रमेशजिचकार, कार्यकारीसंचालक, महाराष्ट्र राज्य संत्रा उत्पादक संघ.

टन संत्रा विक्रीचे उद्दिष्ट
-मागील२० दिवसांत आम्हा सर्वांच्या प्रयत्नातून ५३ टन संत्रा पुण्यात विकला आहे. या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे. याकामी अनेक विभागाचे सहकार्य लाभले. पाच हजार टनांपर्यंत संत्रा विक्रीचे आमचे उद्दिष्ट आहे. डॉ. सुधीरकुमार गोयल यांनीही अनेक कंपनींना पत्र देऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. रवींद्रठाकरे, प्रकल्पसंचालक, केम. (अमरावती)

राहण्याची व्यवस्था केली
अमरावतीवरूनसंत्रा घेऊन पुण्याला जाण्यासाठी १२ ते १४ तास लागतात. बाजारपेठेची आवक लक्षात घेता, ताजे संत्रा अमरावतीवरून घेऊन जावे लागते.पुण्यातील बाजारपेठेत शेतकरी स्वत:च संत्र्याची विक्री करीत आहेत. त्यामुळे जिल्‍हृयातील शेतकऱ्यांना तेथे राहण्यासाठी माफक दरात व्यवस्था करून देण्यात आली. गुलटेकडी बाजारपेठ परिसरातच ही व्यवस्था ‘केम’ने उपलब्ध केली आहे.
वीस दिवसांत १६ लाखांचा व्यवसाय
संत्र्यालास्थानिक बाजारपेठेत भाव नाही. याचवेळी पुण्यात तिप्पट भाव मिळत आहे. सध्या अमरावती जिल्ह्यातील वरुड, अचलपूर, चांदूरबाजार येथील जवळपास ६० शेतकऱ्यांनी ५३ टन संत्रा विकला आहे. पुण्यात सरासरी किलोमागे ३० ते ३२ रुपये दर मिळत आहे. याचा हिशेब केल्यास १६ लाख रुपयांचा व्यवसाय शेतकऱ्यांचा झाला आहे. अमरावतीवरून पुण्यात संत्रा घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्याला प्रती किलो सरासरी सहा ते सात रुपये खर्च येतो.