अमरावती- अनाथ,निराधार मुलींचे अश्रू पुसत त्यांच्या जीवनात सुख आशेचा किरण पोहोचवण्याची धडपड. सामाजिक सुधारणेवर भाषणबाजी करता प्रत्यक्षात समाजात बदल घडवून आणण्याचा निश्चय आणि नि:स्वार्थ भावनेने परोपकार करत राहण्याची अंतर्मनाची हाक, या बळावर एक व्यक्ती आतापर्यंत तब्बल नऊ निराधार मुलींचा आधार झाला आहे. त्यांचे नाव आहे गजानन जाधव.
रविवारी त्यांनी नवव्या मानसकन्येचे लग्न लावून दिले. यामध्ये काही अनाथ, तर काही निराधार मुलींचा समावेश होता. जाधव हे गर्भश्रीमंत नाहीत िकंवा त्यांची कोणती स्वयंसेवी संस्थाही नाही. ते स्वत: अत्यंत नाजूक परिस्थितीतून उभे राहिले आहेत. दुसऱ्यांकडे काम करत िशक्षण पूर्ण केले. मागील पंधरा वर्षांपासून ते कॅटरिंगचा व्यवसाय करतात. यातून संसाराचा गाढा ओढताना अनेक निराधार, अनाथ मुलींचे त्यांनी पालकत्व घेतले. मागील आठ वर्षांत त्यांनी
विवाह लावून दिलेल्या नऊ मुलींमध्ये तीन अनाथ, तर सहा निराधार आहेत. मात्र, प्रसिद्धीपासून दूर राहत त्यांनी
आपले व्रत कायम राखले आहे. 2010पासून त्यांच्याकडे सोनू तिची बहीण या दोन मुली राहत होत्या. गजाननरावांनी सोनूच्या बहिणीचा विवाह दोन वर्षांपूर्वीच लावून िदला. रविवारी (दि. 2) त्यांनी ‘सोनू’चेही कन्यादान केले. पुणे येथील रवींद्र वर्मा नामक युवकाशी रविवारी सोनूचा विवाह थाटात पार पडला.
परिश्रम, सर्वांच्या सहयोगाने आज सर्वकाही मिळवले.दुस-यांना आनंद देऊन मिळणारे सुख अमूल्य आहे. त्या सुखाची अनुभूती आपणास या सामाजिक कार्यातून येते. आज नवव्या मानसकन्येचे लग्न लावून देताना ऊर आनंदाने भरून आला. तसेच, मुलगी सासरी जाताना अश्रूंही तरळले. गजाननरावजाधव,