आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पळसखेडचे तरुण वळले आधुनिक शेतीकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदूररेल्वे- पारंपरिकशेती त्यातही साथ देणारा निसर्ग यामुळे शेतकरी दरवर्षी ‘भूईसपाट’ होत आहे. मात्र, संकटांशी दोन हात करत तो दरवर्षी नव्या दमाने आव्हानांना सामोरे जातो. तालुक्यातील पळसखेड येथील शेतकऱ्यांनीही दुष्काळजन्य परिस्थीतीपुढे हार मानता आधुनिक शेतीचा पर्याय निवडला आहे. येथील तरूण शेतकरी मल्चिंग पेपर पद्धतीचा वापर करून लाखो रूपयांचे उत्पादन घेत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस आधुनिक शेतीचे प्रमाण या गावात वाढत आहे.
मागील वर्षी गावातील काही तरूण शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपरचे सरीवरंब्यावर आच्छादन करून ठिबक लावून लागवड केली. विविध पिकांमध्ये लाखो रूपयांचे उत्पादन या शेतकऱ्यांनी मिळवले. त्यामुळे या आधुनिक पद्धतीचे अनेक शेतकऱ्यांनी यंदा अनुकरन केले आहे. गावातील काही शेतकऱ्यांनी मागील वर्षी मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले. सध्या कपाशी लागवडीसह पळसखेड येथे हळद पिकही घेतले जात आहे. भाजीपाला पिकाची दिवसेंदिवस वाढणारी गरज लक्षात घेता विनोद ढगे यांनी टाेमॅटो, ढेमसे, काकडी, मिरची यासारखी पिके घेऊन लाखाेंचे उत्पादन घेतले आहे. अमोल नाखले, नरेंद्र नाखले, विनोद ढगे या शेतकऱ्यांनीही या आधुनिक शेतीव्दारे भाजीपाला पिके घेतली आहेत.
मल्चिंग पेपरचा वापर करून शेतकरी आधुनिक शेती करत आहेत.
आधुनिक शेतीची पुरेपुर माहिती घेऊन तरूण शेतकरी दरवर्षी भरघोस उत्पादन गावात घेत आहेत. त्यामुळे पळसखेड हे गावं आधुनिक शेतीमध्ये आपली नवीन ओळख निर्माण करत आहे.

मल्चिंग पेपरचा वापर करून आधुनिक शेती करणारे शेतकरी भाजीपाला पिकांकडे अधिक वळत आहेत. हळद, ढेमसे, काकडी, टरबूज, मिरची, अद्रक, टोमॅटो, वांगी, भेंडी अशी पिके घेऊन त्यामधून भरपूर उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा मानस आहे.
तंत्रज्ञान शेतीचे

बातम्या आणखी आहेत...