आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Panther Find In Dead Condition Near Yvatmal City

यवतमाळ शहरालगतच बिबट्या आढळला मृतावस्थेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - यवतमाळ शहरालगतच्या मोहा फाटा नजीक असलेल्या उकंडा पोड परिसरात गुरुवारी मृतावस्थेतील बिबट्या आढळल्याने एकच खळबळ निर्माण झाली. दरम्यान या बिबट्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केल्या जात असून वन विभाग तपास करीत आहे.

सकाळी 11 वाजताच्या सुमारास वन अधिकारी शंकर मडावी, वन्यजीव रक्षक श्याम जोशी तसेच इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा केल्यानंतर बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता त्याचेवर घटनास्थळीच अंत्यसंस्कार करण्यात आले. या बिबट्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या बिबटयाचे दात सुध्दा नव्हते. गोपनीय पध्दतीने वनविभागाने जंगलातच त्याच्यावर अंत्यसंस्कार करुन टाकले अशीही चर्चा आहे.

परिसरात शाळा : मोहा फाटा परिसरात अनेक कॉलेज तसेच शाळा आहेत. सेंट अलॉयशियस ही लहान मुलांची शाळा सुध्दा याच परिसरात आहे. याच परिसरात बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने शाळा प्रशासनामध्ये दहशत निर्माण झाली आहे. पाणी पिण्यासाठी हा बिबट्या परिसरात आला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.