आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंग्यासाठी सरसावले पालक अन् बालकही..!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-‘ध्वजारोहणाची गडबड आटोपल्यानंतर शहरातील अनेक भागांतून फिरलो. मागील वर्षीचा अनुभव बघता, यंदा कागद आणि प्लास्टिकचे ध्वज गोळा करण्यासाठी फेरीच काढणार होतो; परंतु यावर्षी रस्त्यांवर ध्वजच आढळलेच नाहीत,’ ही प्रतिक्रिया आहे, मैत्री संघटनेचे अविनाश भाकरे यांची.
प्रजासत्ताकदिन, स्वातंत्र्यदिन, महाराष्ट्र दिनी बाजारात कागदाचे आणि प्लास्टिकचे ध्वज मोठय़ा प्रमाणावर विकले जातात. राष्ट्रीय उत्सव असल्याने अनेकांच्या अंगी या दिवशी देशभक्तीचा संचार होतो. वाहनांवर, हातांमध्ये असे ध्वज घेऊन ते दिवसभर दिमाखाने मिरवतातही; पण यातील काहींच्या हातून हे ध्वज अनावधानाने अन्यत्र पडतात. कागदाचा असो, की प्लास्टिकचा, राष्ट्रध्वज तो राष्ट्रध्वजच. म्हणून ‘दिव्य मराठी’ने यंदा राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ खास अभियान सुरू केले. त्यातून शाळा, कॉलेज, व्यापारी संकुलं, ध्वज विक्रेत्यांमध्ये प्रचार-प्रसार केला. एसएमएस आणि सोशल मीडियातूनही जनजागृती करण्यात आली. विद्यार्थी, तरुणांनी राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ शपथ घेतली, त्याचा परिणाम प्रजासत्ताक दिनी दिसून आला.