आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती शहरात द ग्रेट पार्किंग सर्कस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - वाहतूक पोलिस आणि महापालिकेचे पार्किंगच्या व्यवस्थेकडे होणारे दुर्लक्ष शहरातील रस्त्यांचा कणा मोडण्याचे मुख्य कारण असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दुचाकींची संख्या वाढत असतानाच पुण्या-मुंबईच्या धर्तीवर बाजारात पार्किंग यंत्रणा कार्यान्वित करण्याची निकड व्यापार्‍यांना भासत आहे.

वाहने इतरत्र करतात उभी
शहरातील राजकमल चौक, श्याम चौक, जवाहर गेट, जयस्तंभ चौक, रॅलीज प्लॉट, कॉटन मार्केट, इतवारा, प्रभात चौक, राजापेठ या प्रमुख चौकांमध्ये ज्या ठिकाणी वाहने उभी करण्याची परवानगी नाही, अशा ठिकाणी वाहनचालक सर्रास वाहने उभी करतात. वाहतुकीवरही याचा परिणाम होतो.

कारच्या जागी लागते दुचाकी
कुथे स्टॉप ते इर्विन चौकापर्यंतच्या उड्डाणपुलाच्या खाली 35 वाहनतळ उभारण्यात आले आहेत. यांपैकी 13 ठिकाणी वाहनतळाची जागा चारचाकी वाहनांकरिता राखीव ठेवण्यात आली आहे, तर 22 ठिकाणी दुचाकी पार्किंगची व्यवस्था आहे. उड्डाणपुलाच्या खाली 8- चारचाकी वाहने आणि 15-- दुचाकी वाहने उभी राहू शकतील, एवढी व्यवस्था आहे. मात्र, चारचाकी वाहनांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर सर्रास दुचाकी वाहने उभी केली जातात, तर दुचाकींकरिता आरक्षित ठिकाणी चारचाकी वाहने उभी असतात. नियम तोडणार्‍या वाहनांवर कारवाई करण्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या वाहनतळावर वाहने उभे करण्यासाठी नियोजन केले तरी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न सुटू शकतो.

रस्त्याच्या दुतर्फा ऑटोरिक्षा
राजकमल चौक, जयस्तंभ चौक आणि श्याम चौक या भागात रस्त्याच्या दुतर्फा ऑटोरिक्षा उभे राहत असल्याने वाहतुकीचा आणि पर्यायाने पार्किंगचा प्रश्न बिकट झाला आहे. प्रवाशांची वाट बघत उभे राहणार्‍या ऑटोरिक्षावरही पोलिस कारवाई करीत नाहीत.

वाहतूक शाखेकडून पाच हजार 491 वाहनचालकांना दंड
शहरात पार्किंगच्या जागेव्यतिरिक्त इतरत्र वाहने उभी केल्यास अनेकदा ते वाहन वाहतूक शाखेची ‘नो पार्किंग व्हॅन’ उचलून घेऊन जाते. त्या वाहनचालकाला 100 रुपयांचा दंड आणि 30 रुपये अतिरिक्त असा 130 रुपयांचा भुर्दंड बसतो. मागील साडेदहा महिन्यांत अशा प्रकरणांमध्ये पाच हजार 491 रुपये दंड वसूल केल्याची माहिती शहर वाहतूक शाखेच्या सूत्रांनी दिली.

शहरातील ‘नो पार्किंग झोन’
- श्याम चौक ते राजकमल चौक (संत कंवरराम मार्केट ते आसाम टी कंपनी वळण)
- राजकमल ते गांधी चौक (माडीवाले कॉम्लेक्ससमोर व कोल्हटकर मेडिकलपर्यंत)
- राजकमल चौक ते जयस्तंभ चौक वळण मार्गावर
- शारदा उद्योग मंदिर ते जयस्तंभ चौक
- श्याम टॉकीजसमोर
- चित्ना टॉकीजसमोर
- प्रभात टॉकीजसमोर
- गांधी चौक वाहनतळ ते ठाकूर फटाका दुकान
- पंचशील लाँड्री ते पोस्ट ऑफिस टी-पॉइंट
- एसटी डेपोचे दोन्ही गेट
- इर्विन हॉस्पिटल गेट ते रेल्वे स्टेशन यार्डलगतचा भाग
- सरोज
शहरातील पार्किंग झोन

-सरोज चौक ते जवाहर गेट (वर्‍हाडे मेडिकल ते पुंड परफ्युम, सी.एम. ज्वेलर्स ते गुल्हाने फूल भांडार दिवसाआड)
-सरोज चौक ते बापट चौक (दोन्ही बाजूस दुचाकी वाहने)
-सरोज चौकातील रॉयल शूज कॉर्नर ते टिप-टॉप -फॅशन (एका रांगेत दुचाकी वाहने)
-चित्ना चौक ते प्रभात चौक (जैन पुरीवाला ते हसमुख टी कंपनी, टिप-टॉप फॅशन ते अजय एंटरप्रायजेस)
-चित्रा चौक - नॉव्हेल्टी टेलर्स ते राज पेंट दुकानापर्यंत
-सरोज चौक - परफेक्ट बूट हाउस ते कला निकेतन साडी सेंटर
-बापट चौक ते प्रभात चौक (र्शीकृष्ण गॅरेज ते न्यू हायस्कूल मेनपर्यंत)
-प्रभात चौक (क्लासिक होजियरी ते किंग वाइन्स- मिर्श पार्किंग)
-बापट चौक - युनिक टाइम्स ते सिंध मेडिकल
-श्याम चौक - सत्यम ते घनश्याम होजियरी
जोशी मार्केट ते सद्गुरू
-श्याम चौक - रघुवीर हॉटेल ते स्वस्तिक ऑप्टिकल
-जयस्तंभ चौक ते मालवीय चौक (प्रकाश इलेक्ट्रिकल ते एस. के. टायर्स मिर्श पार्किंग)
-जयस्तंभ चौक ते मालवीय चौक - कृष्णा वॉशिंग ते प्रिया टॉकीज
प्रिया टॉकीज ते जयस्तंभ चौक
-जयस्तंभ चौक ते दीपक चौक (दोन्ही बाजूस)
रॅलीज प्लॉट ते मालधक्का मिर्श पार्किंग
-जयस्तंभ चौक - सामरा सिल्क ते कुमार स्टेशनरीपर्यंत
जयस्तंभ चौक ते श्याम चौक
-राजकमल ते कुथे हॉस्पिटल (उड्डाणपुलाखाली)
पोलिस स्टेशन राजापेठ ते महालक्ष्मी मेडिकल मिर्श पार्किंग
गद्रे चौक ते पालिका हॉटेल
-त्निमूर्ती मेडिकल ते राजापेठ रेल्वे फाटक
-चित्ना चौक ते टांगा पाडाव (दोन्ही बाजूस)
-चित्ना चौक ते दीपक चौक मिर्श पार्किंग
-दीपक चौक ते मालीवय चौक मिर्श पार्किंग
-राजकमल चौक ते नेहरू मैदान गेट (दोन्ही बाजूस)
-राजकमल चौक ते गांधी चौक (दोन्ही बाजूस)
-गांधी चौक ते टांगा पडाव (दोन्ही बाजूस)
श्याम चौक ते साबणपुरा खिडकी चौक (दोन्ही बाजूस)
-पोस्ट ऑफिस ते तहसील कार्यालय
-मालवीय चौक ते इर्विन चौक (उड्डाणपुलाखाली)
-इर्विन चौक ते रेल्वे स्टेशन चौक
-रेल्वे स्टेशन ते एसटी डेपो
-राजापेठ ते दस्तुरनगर