आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रसंतांच्या जन्मभूमीतून ‘आदर्श ग्राम’ संकल्प!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मानवताही पंथ मेरा, इंन्सानियत है पक्ष मेरा सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना कर्म मेरा।।
एक जात बनाना वर्म मेरा, सब साथ चलना मर्म मेरा। निच उच हटाना गर्व मेरा, गिरते को ऊठाना स्वर्ग मेरा।।
असासंदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या यावली (शहिद) या गावातून जिल्ह्यात सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी संकल्प केल्या जाणार आहे. राष्ट्रसंतांची जन्मभूमी असलेल्या यावलीची निवड खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली. केंद्रीय ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांना याबाबत खासदार आनंदराव अडसूळ यांनी पत्र लिहिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी खासदारांनी त्यांच्या संसदीय क्षेत्रातील एका गावाची आदर्श ग्राम म्हणून निवडीचे आवाहन केले होते. जिल्ह्यातील अन्य गावांनी त्यापासून आदर्श घेता यावा, असे या योजनेचे स्वरुप आहे. शासकीय योजनेसोबतच भारतीय संस्कृतीचे जतन, पर्यावरण संवर्धन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गावांनी केल्यास खऱ्या अर्थाने ते आदर्श ग्राम ठरणार आहे.
यावलीने शासन स्तरावरील अनेक पुरस्कार पटकावले आहे. मानवतेची, राष्ट्रभक्तीची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंतांची जन्मभूमी असलेल्या गावाला सांसद आदर्श ग्राम योजनेत सहभागी होण्याची संधी आहे. राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून दिलेल्या शिकवणूकीचे यावली प्रत्यक्ष आचरण करत आहेत. पंतप्रधानांना अपेक्षित आदर्श गावांपैकी यावली एक असून त्याचा समावेश सांसद आदर्श ग्राम योजनेत केला आहे. यावलीची लोकसंख्या ४,४८८ असून राष्ट्रसंतांचे जन्मगाव आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आधुनिक युगातील देशातील महान द्रष्टे संत होते. क्रांतिकारी विचार घरा-घरांपर्यंत पोहचविण्याचा ध्यास असलेले राष्ट्रसंत सदैव स्मरणात राहणारे व्यक्तिमत्व आहे. गावाच्या प्रगतीसाठी स्वयंसेवा अाणि आत्मोन्नतीचा संदेश राष्ट्रसंतांनी दिला आहे. त्यामुळे राष्ट्रसंतांची जन्मभूमी असलेल्या यावली येथून सांसद आदर्श ग्राम योजनेचा शुभारंभ करीत असल्याचे खासदारांनी पत्रात म्हटले आहे.
यावली देणार प्रेरणा
सासंदआदर्श ग्राम योजनेसाठी खासदार आनंदराव अडसूळ यांनी यावलीची निवड केली आहे. यावलीला योजनेत समावेश करुन घेण्याबाबत केंद्रीय ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले आहे. जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ यावली येथून केल्या जाणार आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील अनेक गावे यावलीपासून ग्रामविकासाची प्रेरणा घेणार आहे.