आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे द्या अन् मिळवा काम चांगले झाल्याचे प्रमाणपत्र!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील उपअभियंता पैसे घेऊन निकृष्ठ कामाचेही चांगले काम झाल्याचे प्रमाणपत्र देत असल्याच्या मुद्द्यावरून जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी (दि. १२) पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान, विभाग उपविभाग स्तरावर अशी कोणतीच तक्रार मिळाल्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याची सफाई अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. दरम्यान, यावरून आक्रमक पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी बैठकीत केली.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील उपअभियंता पैसे घेऊन निकृष्ठ झालेल्या कामाचे काम चांगले झाल्याचे प्रमाणपत्र देतात. त्यानंतर पैसे दिल्यास त्याच कामाचे काम वाईट झाल्याचे प्रमाणपत्र देत असल्याच्या तक्रारी असल्याचा मुद्दा बबलू देशमुख यांनी उपस्थित केला. देशमुख म्हणाले, याबाबत कंत्राटदारांच्या तक्रारी आल्यात. त्यामुळे याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली. दरम्यान, याबाबत अभियंत्याविरुद्ध एकाही कंत्राटदाराची तक्रार आल्यामुळे चौकशीचा प्रश्नच उद्भवत नसल्याची सफाई अधिकाऱ्याकडून देण्यात आली. यावर देशमुख चांगलेच उखडले. ते म्हणाले, स्थायीच्या बैठकीत मुद्दा उपस्थित होत असल्यामुळे ही तक्रार समजून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली. या मुद्द्यावरून सभागृह चांगलेच तापले.
दरम्यान, अखेर अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले. दरम्यान, शिक्षण समितीला विश्वासात घेता समितीची मंजुरी घेता गटविकास अधिकारी परस्पर निधी खर्च करीत असल्याचा आरोप बांधकाम समिती सभापती गिरीश कराळे यांनी केला. बैठकीला जि.प. अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळेसह विषय समित्यांचे सभापती, पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.
अंजनगाव सुर्जी- खोडगाव रस्त्याच्या दुस्तीसाठी ४५ लाख
अंजनगाव सुर्जी -हुसेनपुर-खोडगाव रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामाला आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. १३ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या लेखाशीर्षाअंतर्गत २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी ४५ लाख ८५ हजार १९८ रुपये या कामासाठी मंजूर करण्यात आले आहे. रस्ता दुरूस्तीचे कंत्राट श्री. रामकिशोर अ‍ॅन्ड सन्स या कंपनीला देण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली.
विरुळ-दिपोरी-वाई-राजना-चांदूर रेल्वे या दहा ते तेरा िकमी लांबीच्या रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामासही सभेत मंजुरी देण्यात आली. या कामावर ४६ लाख ९० हजार ४९३ रुपये खर्च करण्यात येणार आहे. या कामाचे कंत्राट मनोहर कांकरिया यांना देण्यात आले आहे. यासोबतच खरपी ते मुक्तागिरी मार्गावरील दिड ते साडेतीन िकमी रस्त्याच्या सुधारणेसाठी ३७ लाख ४९ हजार ५५६ रुपये मंजूर करण्यात आले असून या कामालाही आज मंजुरी देण्यात आली. या कामाचे कंत्राट श्री. रामकिशोर अ‍ॅन्ड सन्स यांना देण्यात आले आहे.
श्री शंकर महाराज संस्थानला ४८ लाख
धामणगाव रेल्वेतालुक्यातील श्री शंकर महाराज संस्थानमध्ये महिलांसाठी भक्त निवासाच्या कामाला आज स्थायीच्या बैठकीत मंजुरी मिळाली. तीर्थक्षेत्र विकास योजना अंतर्गत २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी या कामासाठी ४८ लाख ३५ हजार ८४० रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. या कामाचे कंत्राट महेंद्र बैस यांना देण्यात आला.
सफाई कामगारांचे पुनर्वसन करणार
ग्रामीण भागात मैला वाहून नेणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस कायद्यानुसार प्रतिबंध घालण्यात आला आहे. दरम्यान, ग्रामीण भागात अशा स्वरूपाची कामे करण्यात येत आहे अथवा नाही याबाबत सर्वेक्षण करून सफाई कामगारांचे शासनाच्यावतीने पुनर्वसन करण्यात येणार आहे.
उमरी इतबारपूरच्या ग्रामसचिवाचे स्थानांतरण
उमरी इतबारपुर (ता. दर्यापूर) येथील ग्रामसचिव एस. बी. धुमाळे यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांचे सासन बु. येथे स्थानांतरण करण्यात आले आहे. १३ मे रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत धुमाळे यांच्या मनमानी कारभाराचा मुद्दा बबलु देशमुख यांनी उपस्थित केला होता.
धुमाळे यांच्याविरुद्ध दाखल तक्रारीची चौकशी करून दर्यापूर येथील गटविकास अधिकाऱ्यांनी १० जून रोजी चौकशी अहवाल सादर केला होता. या अहवालात धुमाळे यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजात अनियमितता केल्याचा ठपका गटविकास अधिकाऱ्यांनी ठेवला होता. यामुळे धुमाळे यांची एक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरूपात रोखून ठेवण्यात आली आहे. यासोबतच धुमाळे यांची सासन बु. येथे स्थानांतरण करण्यात आले आहे.