आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवाढ प्रकरण : विद्यार्थ्यांना झटका, कर्मचार्‍याला फटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमरावती - डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस प्रथम वर्षाच्या पाच विद्यार्थ्यांनी गुणवाढ केली यामध्ये महाविद्यालयातील दोन कर्मचार्‍यांचा सहभाग आसल्याचे चौकशी समितीने दिलेल्या आहवालात पुढे आले आहे. त्यामुळे आधिष्ठाता डॉ. दिलीप जाणे यांनी प्रकरणात पाच विद्यार्थ्यांसह दोन कर्मचार्‍यांना शिक्षा केली आहे. हे प्रकरण सर्वप्रथम ‘दै. दिव्य मराठी'ने उघडकीस आणले होते.

धिरजकुमार यादव, जगमोहनसिंग यादव, महेश सरडा, जावेद पटेल आणि यतेन्द्रकुमार शर्मा या पाच विद्यार्थ्यांनी गुणवाढ केल्याचे उघड झाल्यानंतर आधिष्ठाता डॉ. जाणे यांनी या पाचही जणांविरुध्द गुरूवारी कारवाई केली आहे. याचवेळी महाविद्यालयात परिचर म्हणून कार्यरत आसलेले विलास आखरे यांची दोन वेतनवाढ राेखण्यासोबतच त्यांची इतरत्र बदली आशी कारवाई करण्यात आली आहे. दीपक कावरे यांना आप्रत्यक्ष सहभाग आसल्याने त्यांना स्पष्ट ताकीद देण्यात आली आहे.

पीडीएमसीमध्ये पंधरा दिवसांपुर्वी आनॉटॉमी (शरीररचना शास्त्र) विषयाच्या उत्तरपत्रिकांमध्ये गुणवाढ केल्याची बाब
ऑनॉटॉमी विभागाच्या प्रमुख डॉ. रावलानी यांच्या लक्षात आले होते. त्यामुळेच डॉ. रावलानी यांनी हा गंभीर प्रकार महाविद्यालयाचे डिन डॉ. दिलीप जाणे यांना सांगितला. या प्रकरणाची दखल घेत डॉ. जाणे यांनी त्रिसदस्यीय समिती नेमून चौकशीचे आदेश दिले होते. या समितीमध्ये मायक्रोबॉयलॉजीचे विभागप्रमुख डॉ. पी. आर. भिसे, फारमॅकॉलॉजीचे प्राध्यापक डॉ. एस. एस. देशपांडे आणि पॅथॉलॉजीचे सहायक प्राध्यापक डॉ. मिलींद जगताप यांचा समावेश होता. या त्रिसदस्यीय समितीने प्रकरणाची चौकशी करून आहवाल आधिष्ठाता डॉ.जाणे यांच्याकडे सादर केला. या आहवालाची डॉ. जाणे यांनी पाहणी केली होती.

प्रथम दर्शनी पाच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांमध्ये गुणवाढ झाली आहे. या मध्ये प्रथमदर्शनी ते पाचही विद्यार्थी दोषी आसल्याचे पुढे आले होते. त्यानंतर डॉ. जाणे यांनी नव्याने सखोल चौकशी करून आहवालातील त्रुटी पुर्ण करून आहवाल नव्याने सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार त्रिसदस्यीय समितीने नव्याने त्रुटींची पुर्तता करून आहवाल डॉ. जाणे यांच्या पुढे सादर केला. या आहवालावरून गुरूवारी पाच विद्यार्थ्यांसह दोन कर्मचार्‍याविरुध्द दोष निश्चित करून कारवाई करण्यात आली आहे.

5 ते १२ गुणांची वाढ, 4 ते १६ एप्रिल दरम्यान केली गुणवाढ : एमबीबीएसच्याप्रथम सत्र परिक्षेत झालेली गुणवाढ ही पुर्वनियोजीतच तयारी होती. कारण ज्या महाभागांनी गुणवाढ करण्याचे धाडस दाखवले. त्यांनी परिक्षेच्यावेळी उत्तरपत्रिकेवर जी उत्तर लीहीलीत, त्या व्यतिरीक्त नव्याने उत्तरपत्रिाकंची पाने जोडण्यात आल्याचे मूल्यांकनादरम्यान लक्षात आले होते. आखरे यांनी आॅनॉटॉमी विभागातून कोर्‍या उत्तरपत्रिका त्या विद्यार्थ्यांना दिल्याचेही चौकशी आहवालात पुढे आलेले आहे. आॅनॉटॉमी विषयाचा पेपर एप्रिल रोजी झाला होता. त्यानंतर १६ एप्रिलला विद्यार्थ्यांना सेल्फ व्हेरीफीकेशनसाठी उत्तरपत्रिका दिली होती. त्यापुर्वीच ही गुणवाढ झाली होती.

नाशिक आरोग्य विद्यापीठाला कळवले
सदरगुणवाढ प्रकरणाबाबत महाविद्यालयाकडून नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठाला पत्राव्दारे कळविण्यात आले आहे. या प्रकरणात महाविद्यालयाच्या वतीने पोलिसात तक्रार दिली जाणार नाही. या प्रकरणात दोषी आढळलेल्याविरुध्द कारवाई केली आसल्याने हा निर्णय घेतल्याचे डाॅ. जाणे यांनी सांगितले आहे.
पुढे काय?
या प्रकरणात चौकशी समितीने दिलेल्या आहवालावरून तुर्तास पाच विद्यार्थी दोन कर्मचार्‍याविरुध्द कारवाई झाली आहे. तसेच एमबीबीएस द्वितीय वर्षाला आसलेल्या एका विद्यार्थ्यांविरुध्द आरोप झालेले आहे. त्यामुळे त्यालाही वॉर्निंग देण्यात आली आहे. या व्यतिरीक्त आजूनही काही माहीती पुढे आली तर आम्ही संबधितांवर कारवाई करणार आसल्याचे डीन डॉ. जाणे यांनी सांगितले.

दोषींवर कारवाई केली
गुणवाढ प्रकरणाचा चौकशी आहवालावरून पाच विद्यार्थी दोन कर्मचार्‍याविरुध्द कारवाई केली आहे. ही कारवाई केल्यामुळे आम्ही आता पोलिस तक्रार करणार नाही. तसेच या प्रकरणात आर्थीक व्यवहार झाला किंवा नाही हे निश्चितपणे पुढे आलेले नाही. आजूनही काही आढळल्यास आम्ही कारवाई करणार आहे. डॉ.दिलीप जाणे, आधिष्ठाता.

विद्यार्थी आन‌् कर्मचार्‍याला आशी झाली शिक्षा
गुणवाढ प्रकरणात दोषी आढळलेल्या पाचही विद्यार्थ्यांना नाशिक आरोग्य विद्यापीठाची उन्हाळी २०१५ मध्ये होणारी परीक्षा देता येणार नाही. याचवेळी ज्या परीक्षेत ही गुणवाढ झालेली होती. ती परीक्षा म्हणजे आंतरमहाविद्यालयीन होती. मात्र ती परीक्षा उत्तीर्ण केल्याशिवाय विद्यापीठाची परीक्षा देता येत नाही. ही परीक्षासुध्दा या पाच विद्यार्थ्यांची रद्ध करण्यात आली आहे. याचवेळी आॅनॉटॉमी विभागात परिचालक म्हणून कार्यरत आसलेले विलास आखरे यांचे दोन वेतनवाढ कायमस्वरूपी बंद केल्या आहेत. तसेच आखरे यांनी या ठिकाणाहून बदली केली जाणार आहे. तर फीजिओलॉजी विभागातील परिचालक दीपक कावरे यांचा आप्रत्यक्षरित्या सहभाग आसल्याचे पुढे आले होते. मात्र ही फारशी गंभीर बाब नसल्याची सबब पुढे करून त्यांना ताकिदपत्र देऊन शिक्षा देण्यात आल्याचे आधिष्ठाता डॉ. दिलीप जाणे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...