आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेढी पूरग्रस्ताची झोपडी; विजेचे बिल तीन हजार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आधीच तोकडी जागा, दररोजचे अन्न मिळवण्यासाठीचा संघर्ष अशात एका पूरग्रस्ताला तीन हजारांवर विजेचे बिल आले आहे. त्यामुळे कुटुंबाचे पोषण करायचे की अव्वाच्या सव्वा बिल भरायचे, असा प्रश्न त्याच्यापुढे उभा ठाकला आहे.

वलगावात पूरग्रस्तांसाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या झोपड्यांमध्ये सरस्वती उके यांचीही एक झोपडी आहे. त्यामध्ये प्रत्येकी एक पंखा, टीव्ही, सीएफएल दिवा आहे. त्याच्या वापराचे 20 मे ते 20 जून या एका महिन्याचे वीज देयक त्या कुटुंबाला तब्बल 3 हजार 180 रुपये आले आहे. वीज देयकाची ही रक्कम पाहून उके कुटुंब चिंतेत पडले आहे. राहायला पक्के घर नाही. काम मिळाले तरच पोट भरण्याची हमी असते. अशी दयनिय अवस्था असताना हजारोंचे देयक कसे भरायचे, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. पूरग्रस्तांना कामसुद्धा उपलब्ध नाही....
कुठून भरायचे तीन हजार?
- आम्हाला एका महिन्याचे वीज बिल तीन हजारांवर आले आहे. काम नाही, पैसा नाही; अशावेळी कसे भरायचे आम्ही तीन हजारांचे विज बिल? घरात एकच दिवा, पंखा, टीव्ही आहे. तरीही इतके बिल आले, याचे आश्चर्य आहे.
सरस्वती उके, पूरग्रस्त, वलगाव.

वीज बिलाची पडताळणी करू
- उके यांच्या वीज बिलाची माहिती घेतली असता, त्यांचा वापर तेवढा दिसून येतो. वाचनाच्या नोंदीनुसार देयक आले आहे. तरीही पडताळणी करून पाहतो. शक्य तेवढे सहकार्य करू.
धीरज दुपारे, सहायक अभियंता, महावितरण, भातकुली उपविभाग.