आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pedhi Rever Flood Issue At Revasa, News In Marathi

रेवसातील 293 विद्यार्थी सुरक्षित, संततधार पावसामुळे पेढी नदीला पुर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - संततधार पावसामुळे पेढी नदीला बुधवारी सकाळी महापूर आला. या पुरामुळे रेवसा येथील निवासी आदिवासी आश्रमशाळेतील 293 विद्यार्थ्यांना तसेच नदीकाठी असलेल्या दहा कुटुंबांतील व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. याचवेळी गावाबाहेर असलेल्या साई मंदिरात अडकलेल्या पाच जणांना दुपारी साडेतीन वाजता सुखरूप बाहेर काढण्यात आले.
रेवसा फाट्यावर एक निवासी अनुदानित आश्रमशाळा आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थी राहतात. सकाळी पेढी नदीने रौद्ररूप धारण केल्याने कोणत्याही क्षणी शाळेत पाणी पोहोचून विद्यार्थ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच शाळेतील शिक्षकांनी हजर असलेल्या 293 विद्यार्थ्यांना तातडीने गावातील राम मंदिरात सुरक्षितस्थळी पोहोचवले होते. बुधवारी येथेच या विद्यार्थ्यांच्या जेवणाची आणि थांबण्याची व्यवस्था केली होती. पेढी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठावरील दहा घरांतील नागरिकांना तातडीने ब्रrाचारी महाराजांच्या मंदिरात सुरक्षितस्थळी पोहोचवले.

घराला टेकलं पाणी, आत जावं कुठं आम्ही!
2007 साली पेढी नदीला महापूर आला होता. त्या वेळी 70 घरांचे नुकसान झाले होते. ज्यांचे घर वाहत गेले, त्यांनी नदीकाठावर तात्पुरते झोपडे उभारले आहेत. बुधवारी त्या झोपड्यांपर्यंत पाणी आले होते. आता करायचं काय? घरात पाणी टेकलं आहे, आता आम्ही कुठं जायचं, असा प्रश्न पुनर्वसितांनी केला आहे.
तब्बल 12 तासांनंतर सुटका
गावाबाहेर ब्रम्हचारी महाराजांच्या समाधीमंदीराला लागून साईमंदीर आहे. या मंदीरात पुजारी म्हणून काम करणारे प्रकाशराव खंडारकर राहतात. बुधवारी पहाटे अचानक पाणी वाढल्यामुळे त्यांच्यासह कुटूंबातील अन्य चार असे पाच जण पाण्यात अडकले होते. दुपारी साडेतीन वाजता त्यांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. तत्पुर्वी 12 तास त्यांनी जीव मुठीत धरून कसेबसे काढले होते.
पुन्हा पेढीप्रकोप : 2007 मध्ये रेवसा येथे पेढीच्या पुराचा फटका बसलेल्या 40 नागरिकांनी तात्पुरते निवारे पेढीच्या काठावर उभारले आहे. बुधवारी आलेल्या पेढीच्या पुराने या तात्पुरत्या निवार्‍यांमध्ये पाणीच पाणी झाले होते. तसेच पेढीने धोक्याची पातळी ओलांडली असल्यामुळे त्या निवार्‍यांचे आणि पेढीच्या पाण्याचे जेमतेम एक फूट अंतर बाकी होते. शासनाकडून अजूनही भरपाई न मिळाल्यामुळे पूरग्रस्तांनी प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.
निवासी आदिवासी आश्रमशाळेतील या विद्यार्थ्यांना पेढी नदीच्या पुरापासून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. गावातील राम मंदिरामध्ये सुरक्षितस्थळी त्यांना पोहोचवले. तेथे त्यांची जेवणाची व थांबण्याची व्यवस्था केली