आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Celibate For Sachin Awarded By Bharatratna Award

सचिनला ‘भारतरत्न’ प्रदान; शहरात तरुणांचा जल्लोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मंगळवारी राष्ट्रपती भवनात आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. मुंबईत वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याने निवृत्ती घेतल्यानंतर काही क्षणांतच त्याला हा बहुमान जाहीर झाला होता. देशभरातील क्रिकेट चाहत्यांची मंगळवारी इच्छापूर्ती झाली. क्रीडाक्षेत्रात हा बहुमान मिळणारा सचिन हा एकमेव खेळाडू आहे. यामुळे अंबानगरीत जल्लोषाचे वातावरण आहे. शहरातील हौशी क्रिकेटप्रेमींनी फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोष करून हा आनंद साजरा केला. काही खेळाडूंनी मैत्री लढतीचे आयोजनही केले.