आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या नावावर ‘जनता' लुटीचा प्रयत्‍न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महापालिकेच्या लेटर पॅडवर शहरातील जनता सहकारी बँकेच्या गाडगे नगर शाखेला बाजार परवाना काढण्याबाबत एकाने नोटीस बजावली. या नोटीसवर मनपाच्या एका सेवानिवृत्त एका बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी असल्यामुळे बँकेला शंका आली. सदर प्रकरणी बँकेने महापालिकेला कळवले. त्या आधारे बाजार परवाना विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांनी या ताेतयाला शुक्रवारी दुपारी बँकेतच पकडले. मात्र महापालिकेने या गंभीर प्रकाराबाबत शुक्रवारी रात्रीपर्यंत पोलिसात तक्रार दिली नव्हती.
बँक अधिकाऱ्यांच्या सावधगिरीचे त्यांनी बॅकेची फसवणूक थांबवली आहे. मात्र या ताेतयाने यापुर्वी असे प्रकार कुठे केले किती रक्कम हडपली याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.
शहरातील राठीनगर भागात जनता सहकारी बॅकेची गाडगेनगर शाखा आहे. या बँकेत २४ जूनला एक व्यक्ती पोहचली. अापण महापालिकेतून आलो असून महापालिका क्षेत्रात बँकींग व्यवसाय करत असल्यामुळे बँकेला बाजार परवाना काढणे आवश्यक असल्याचे त्याने बॅक अधिकाऱ्यांना सांगितले. इतक्यावरच थांबता त्याने चक्क एक नोटीस सुध्दा बँकेतील कर्मचाऱ्यांना दिली.

शाखा व्यवस्थापक नसल्याने कर्मचाऱ्यांनी या ताेतयाला गुरुवारी (दि. २५) पुन्हा बँकेत बोलावले. यावेळी बँकेचे शाखा व्यवस्थापक विलास शेरेकर यांच्यासोबत या ताेतयाची भेट झाली. त्याने बाजार परवाना नुतनीकरणासंदर्भात शेरेकर यांना सांगितले. बाजार परवाना काढणे बँकेला अावश्यक असल्याचे सांगत उर्वरितपान
तक्रार देण्याचे आदेश दिले

संबधित व्यक्तीकडे महापािलकेशी संबधित दस्तऐवज आढळणेे, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे बाजार परवाना विभागाचे अधीक्षक मानविराज दंदे सहायक अधीक्षक वाकपांजर यांना लेखी पत्र देऊन सदर तोतया व्यक्तीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहे.
विनाय कऔगड, उपायुक्त, मनपा.