आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Of Amravati Participate In Cleanliness Campaign

शहर स्वच्छतेसाठी सरसावले सजग अमरावतीकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावती शहर सुंदर आणि स्वच्छ करण्यासाठी दै. ‘दिव्य मराठी’तर्फे सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता महाअभियानासाठी अनेक अमरावतीकर सरसावले आहेत.

‘दिव्य मराठी’मध्ये स्वच्छतेसंबंधीचे वृत्त प्रकाशित होताच अनेक अमरावतीकरांनी एसएमएस, मेल, व्‍हॉट्सअॅपच्या माध्यमातून ‘मी कचरा करणार नाही आणि शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेणार’ असल्याचे वचन दिले. याच सोबत या महाअभियानात सहभागी होत शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेणार असल्याचाही त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे.

लवकरच खत प्रकल्प
-कम्पोस्टडेपोला लागूनच कचऱ्यातून खत िनर्मितीचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. इको िफल नावाची कंपनी हे काम करणार आहे. त्यांना आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून देण्यात अद्याप यश आले नाही. अरुणडोंगरे, आयुक्त,महापालिका.

स्वत:ची जबाबदारी समजा
-आपणच कचरा केला नाही, तर अस्वच्छता होण्याचा प्रश्नच येत नाही. कचरा करू नये, कचरा दिसल्यास स्वत:ची जबाबदारी म्हणून तो साफ करावा. हे काम प्रत्येकाने घरासह परिसरात केल्यास अस्वच्छता होणारच नाही. भारत गणेशपुरे, अभिनेता.

यांनी दिले स्वच्छतेचे वचन
विनोद अग्रवाल, बडनेरा; सतीश काळे, संजय विधळे, कॅम्प; हृषीकेश वसू, अमोल मसराम, तुषार बरबुडे, आदित्य लेवरकर, स्वितेश भगत, अजिंक्य पाटील, शरयू काळे, समीर पत्की, रितेश बोबडे, श्रद्धा पाटील, निखिल गाले, भाग्येश राऊत, प्रणय मेहरे, हृषीकेश देशमुख, अंकुश जुनघरे, संकेत इंगाेले, अंकुश डहाके, आकाश हिवसे, शुभम वानखडे, अक्षय नागापुरे, राजेश भांगे, निखिल लुंगे, आकाश येते, साकेत बोंडे, आशीष लोखंडे, ललित धुळे, विवेक धसकट, विनय नेऊलकर, अमित गांजरे, सारंग देशमुख, अविनाश भाकरे आदींसह अनेकांनी ‘दिव्य मराठी’च्या अभियानात सहभागी होत स्वच्छता पाळण्याचे वचन दिले.

आपणही होऊ शकता या महाअभियानात सहभागी
शहर, राहता त्या ठिकाणचा परिसर अस्वच्छ करणार नाही याचे आम्हाला वचन द्या. यासाठी आम्हाला Amravati Promise लिहून आपल्या नावासह 8411969041 या नंबरवर sms करा.
व्‍हॉट‌्सअॅपच्या माध्यमातूनही तुमचे वचन Amravati Promise लिहून नावासह 9403029300 वर पाठवू शकता.
तुमची संस्था, संघटना किंवा सोसायटीचे वचन पत्र आम्हाला dmamravati13@gmail.com वर इ-मेल करू शकता.