आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणा लँडमार्कविराेधात आयुक्तालयावर धडक , पोलिस आयुक्तालय जिल्हा कचेरीवर धडक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राणालँडमार्ककडून ना घर मिळाले, ना दुकान.. यामुळे संतप्त नागिरकांनी बुधवारी जिल्हा कचेरी अािण पाेिलस अायुक्तालयावर धडक दिली.

पै-पै गोळा करून घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या शेकडो सर्वसामान्य नागरिकांनी दोन वर्षांपूर्वी शहरात आलेल्या राणा लँडमार्क या कंपनीसाेबत घर, दुकान, फ्लॅट घेण्यासाठी व्यवहार केले. दोन वर्षांत आपली मालमत्ता बांधून देण्यात येईल, असे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले होते; तसेच व्यवहारादरम्यान अनेक ग्राहकांकडून या मालमत्तेच्या एकूण किमतींपैकी एक चतुर्थांश रक्कम इसार स्वरूपात घेतली. मात्र, दोन वर्षांनंतरही ना घर मिळाले, ना घेतलेली रक्कम, असे ग्राहक संतप्त होऊन सांगत होते. मालमत्तेचा ताबा दिला नाही, यासंदर्भात ३० जून २०१३ ला कंपनीच्या संचालकांसोबत ग्राहकांनी चर्चा केली. त्या वेळी कंपनीकडून स्टॅम्पपेपर संमतीपत्र लिहून देण्यात आले होते. या व्यवहारात घेतलेली रक्कम ३० दिवसांच्या आतमध्ये १० टक्के द. सा. द. शे. दराने परत करण्यात येईल. मात्र, अजूनही रक्कम मिळाली नसल्याचे नागिरकांचे म्हणणे अाहे.
दाेन लाख ७५ हजार रुपये दिले हाेते
दोनवर्षांपूर्वी राणा लँडमार्कमध्ये गुणवंतवाडी परिसरातील अपार्टमेंटमध्ये वन बीएचके फ्लॅट बुक केला. त्याच्या इसार रूपात दाेन लाख ७५ हजार रुपये दिले. नोकरी करतो. जेमतेम १४ हजार वेतन मिळते. अशा स्थितीत करायचे काय? राणाने आमचे पैसे परत करावे. राजेशगरकळ, ग्राहक
दोनफ्लॅट केले बुक
राणालँडमार्कमध्ये वन बीएचकेचे दोन फ्लॅट दोन वर्षांपूर्वी बुक केले. त्यासाठी आतापर्यंत तीन लाख ६६ हजार ७५० रुपयांची रक्कम राणा लँडमार्क कंपनीला दिली. मात्र, अजून ना फ्लॅट मिळाले, ना रक्कम परत मिळाली. आता आमची रक्कम तरी परत करावी. सुनीलघनाडे, ग्राहक