आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्शी येथे लग्नाचे आश्वासन देऊन अत्याचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- - शिरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीच्या गावातील एका सरपंचाने २२ वर्षीय युवतीला लग्नाचे आश्वासन देऊन दोन महिने तिला घरात ठेवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. या प्रकारामुळे त्या युवतीने रविवारी रात्री शिरखेड पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी सरपंचाला अटक केली आहे. सरपंच हा विवाहित असून, त्याला पत्नी मुले आहेत. सरपंचाने दोन महिन्यांत अनेकदा युवतीसोबत अत्याचार केला. सोमवारी पोलिसांनी अटक केल्यावर सरपंचाला न्यायालयापुढे हजर केले होते. त्या वेळी न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असल्याचे शिरखेडचे ठाणेदार गायकवाड यांनी सांगितले.