आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदच्या भीतीपोटी शहरात पंपांवर दिसली गर्दी , इंधन विक्रीत ४० टक्क्यांची वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पेट्रोलपंपबेमुदत बंद राहणार असल्याच्या भितीपोटी सोमवारी शहरात दिवसभरात तब्बल ८० हजार लिटर इंधनविक्री झाली. बंद पडल्यास गाड्या चालवायच्या कशा, या भीतीपोटी अमरावतीकर टाक्या फुल्ल करण्यासाठी रस्त्यावर उतरले.
नागरिकांची एकच झुंबड उडाल्यामुळे पंपांसमोर रांगाच-रांगा लागल्या. आवश्यकता नसताना अनेकांनी दुचाकीत ५०० रुपयांपर्यंचे पेट्रोल भरुन घेतले.पेट्रोलपंप असोसिएशनने इंधनावरील एलबीटी व्हॅट दर कमी करण्यात यावेत, यासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलपंप बेदमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे, नागरिकांमध्ये घबराट निर्माम झाली होती. मात्र, सायंकाळी संप स्थगीत करण्याचा निर्णय झाल्यामुळे सर्वकाही पूर्ववत झाले.
दरम्यान, शहरातील पंपमालकांच्या तिजोरीत एकाच दिवशी ५० लाखांच्यावर पैसे जमा झाले. शहरात २२ पेट्रोलपंप आहेत. त्यापैकी काही पंपांवर इंधन नसल्यामुळे ते साेमवारी दुपारनंतर बंद होते. परिणामी, उर्वरित पंपांवर नागरिकांनी गर्दी केली होती. एऱ्हवी सामान्य दिवशी दररोज ५५ हजार लिटर पेट्रोल १० हजार लिटर डिझेलची विक्री होते. मात्र, संभावित संपाच्या भितीपोटी अमरावतीकरांनी सोमवारी एकाच दिवशी ६५ हजार लिटर पेट्रोल १५ हजार लिटर डिझेल भरत गाडीच्या टाक्या फुल्ल केल्याची मािहती जिल्हा पेट्रोल पेट्रोलपंप असोसिएशनचे सचिव सौरभ जगताप यांनी दिली. दरम्यान, सोमवारी सायंकाळी बंद स्थगित झाल्याचे वृत्त झळकताच लगेचच पेट्रोलपंपावरील गर्दी आेसरली. त्यामुळे, सायंकाळनंतर परिस्थिती सामान्य झाल्याचे जगताप यांनी सांगितले. दोन ते पाच टक्के एलबीटी १८ ते २४ टक्के व्हॅट कर कमी करण्याच्या मागणीसाठी बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान, यात ताेडगा निघाल्याने बंद मागे घेण्यात अाला. मंगळवारी मात्र, पंपांवर गर्दी नव्हती.
इंधन विक्रीत ४० टक्क्यांची वाढ
सामान्यिदवसांपेक्षा सोमवारी इंधन विक्रीत सुमारे ४० टक्क्यांनी वाढ झाली. दिवसभर नागरिकांनी इंधन भरण्यासाठी माेठी गर्दी केली होती. इंधनावरील अधिकचा कर कमी करण्याची असोिसएशनची मागणी होती. मात्र, यावर यशस्वी तोडगा निघाल्यामुळे बंद मागे घेण्यात आला अाहे. शासनाने मागण्या मान्य करण्याचे अाश्वासन दिले अाहे. ते शासनाने पाळल्यास पुन्हा बंद करण्याची वेळच येणार नाही. सौरभजगताप, सचिव,अमरावती जिल्हा पेट्रोलपंप असोसिएशन