आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड दिवस राहणार पेट्रोलपंप बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - एलबीटी,व्हँट एसएससी या महत्वपूर्ण विषयावर राज्य सरकारने तत्काळ नरि्णय घ्यावा, या मागणीसाठी पेट्रोलपंप चालकांनी शनिवारी (दि.११) ऑईल कंपन्यांकडून इंधन खरेदी करता १२ तास पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शनिवारी दूपारनंतर तर रविवारी इंधन तुटवड्यामुळे दिवसभर पेट्रोलपंप बंद राहण्याची शक्यता आहे.

दीड दिवस पेट्रोलपंप बंद राहणार असल्याने वाहनचालकांची गैरसोय होऊ शकते. सरकारने अपेक्षित नरि्णय घेतल्यास १७ १८ एप्रिल रोजी १२ तास पेट्रोलपंप बंद ठेवले जातील. त्यानंतरही न्याय मिळाल्यास २७ एप्रिलपासून बेमुदत इंधन खरेदी बंद आंदोलन करण्याचा इशारा अमरावती जिल्हा पेट्रोल डिझेल असोसिएशनने दिला आहे. दरम्यान, या आंदोलनात जिल्ह्यातील १२२ तर शहरातील २३ पंपचालक सहभागी होणार आहेत. सीआयपीडीने पंपचालकांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारले आहे.

१२ तासच इंधन विक्री
शनिवारी ११ एप्रिलला १२ तासच इंधन विक्री सुरू राहील. सुविधा शुल्कासह इंधन दर वाढीची तारीख निश्चित असावी यांसह इतर मागण्यांची पूर्तता करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. सौरभ जगताप, सचवि, डिस्ट्रीक पेट्रोल असोसिएशन.

रविवारी होऊ शकते गैरसोय
११एप्रिल रोजी इंधन खरेदी बंद आंदोलन केले जाणार असून, या दिवशी एका सत्रातच इंधन विक्री होईल. रवविार सुटीचा दिवस असल्याकारणाने पेट्रोलपंप चालकांना इंधन खरेदी करता येणार नाही. त्यामुळे रविवारी इंधन तुटवड्यामुळे अनेक पेट्रोलंपप बंद राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ शकते.